प्रवासी वळला खाजगी वाहनांकडे मंडळाच्या योजनांचा कर्मचाऱ्यांकडून हरताळ.

*खासगी बस थांब्यामुळे एसटीच्या उत्पन्नात घट!* 

 प्रवासी वळला खाजगी वाहनांकडे मंडळाच्या योजनांचा कर्मचाऱ्यांकडून हरताळ.

खरवंडी दी.६ (प्रतिनिधी विशाल कुरे) 
राज्य परिवहन मंडळाच्या साध्या व जलद गाड्या वडाळ्या जवळील अधिकृत बस तांब्यावर एक तासभर थांबा घेत असल्याने प्रवासी खाजगी वाहनांकडे उत्पन्नात घट होत आहे .
एसटी महामंडळाच्या बस वडाळ्यात नजीक जेवणासाठी थांबत असल्याने तेथे कमीत कमी एक तास जातो. या वेळेत प्रवासी तोपर्यंत नगरला पोहोचतो येथे 100 मीटर अंतर मध्ये दोन बस थांबे असून नेवासाहून बसणारा प्रवासी हकनाक एक तासभर थांबल्याने त्याला पुढील प्रवासासाठी व पुढील बस मिळेल की नाही याची शाश्वती नसते.
याबाबत अगर प्रमुखांशी संपर्क साधला असता आम्ही कुठलीही परवानगी या धाबे वाल्याला दिलेली नसल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे.
 मग चालक वाहनाकडून या धाब्यावर बस. 
कसे थांबवण्यात येते, याबाबत आश्चर्यच व्यक्त करण्यात येत आहे एस टी महामंडळाला यामुळे तोटा सहण करावा लागत आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.