नेवाशात उसाला 3100 रु.पहिली उचल देण्यासाठी तहसील कार्यालयात बैठक.. मा आ.मुरकुटे
नेवासा (प्रतिनिधी, )सन २०२३-२४ च्या गळितास जाणाऱ्या उसाला मुळा, ज्ञानेश्वर, गंगामाई व अशोक साखर कारखान्याकडून उस उत्पादक शेतकऱ्यांना 3100 रुपये पहिली उचल मिळावी यासाठी नेवासा तहसीलदार कार्यालयात बुधवार दिनांक 06/12/2023 रोजी सकाळी 10 वा. सर्व पक्षीय महत्त्वपुर्ण बैठक घेण्यात येणार आहे. यासाठी उस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहवे असे आवाहन मा आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुश काळे , भाजपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी केले आहे. नेवासा तालुक्यातील मुळा व ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्या बरोबर गंगामाई व अशोक साखर कारखान्याकडून उसाचा दर जाहीर करण्यात आला नसल्याने उस उत्पादक शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त करत तालुक्यातून या साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणावर उस जात आहे. हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला तरी दर जाहीर केला जात नाही. त्यामुळे तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांना 3100 रुपये पहिली उचल मिळावी यासाठी नेवासा तहसीलदार यांच्या समवेत बैठक घेण्यात येणार असून यासाठी शेतकऱ्यांनी बुधवारी 6 तारखेला उपस्थित राहवे असे आवाहन मा आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.
विखे पाटलांनी 3000 रु भाव दिल्याबद्दल त्यांचे आभार यावेळी बाळासाहेब मुरकुटे यांनी मांडले..