शनिशिंगणापूर
भारताच्या राष्ट्रपती मुर्मू यांनी यांनी घेतले शनि देवाचे दर्शन, याबाबत सविस्तर माहिती अशी की राष्ट्रपती यांचे विशेष विमान, झापवाडी येथे तयार केलेले हेलिपॅड येथे उतरताच राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तसेच पुढे शनी मंदिर येथे येतात राष्ट्रपती यांचे मंदिर परिसरात आगमन झाल्यावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी स्वागत केले, राष्ट्रपती मुर्मू यांनी चौथऱ्यावर जाऊन शनी मूर्तीस तेल अर्पण करून दर्शन घेतले,यावेळी अध्यक्ष भागवत बनकर, उपअध्यक्ष विकास बनकर यांनी शाल, श्रीफळ व शनी प्रतिमा देऊन राष्ट्रपतींचा सन्मान यावेळी केला त्यानंतर, दर्शन झाल्यावर राष्ट्रपतींनी प्रसादलयात महाराष्ट्रीयन जेवण केले,यावेळी संपूर्ण शिंगणापूर परिसरात सर्वत्र बेरेकेटिंग केले होते,सर्व वाहनतळ बंद करण्यात आले होते,गेल्या दोन दिवसापासून शिंगणापूर गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होत यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस,पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार सुजय विखे पाटील,माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, नितीन दिनकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील, अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना,नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.