नेवासा येथे शेतकरी ऊस परिषद लक्ष्मी मंगल कार्यालय नेवासे फाटा येथे संपन झाली ,यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी संघटना रघुनाथ दादा पाटील, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष विधी तज्ञ अजित काळे साहेब, त्याचबरोबर शिवाजी नाना नांदखेले व श्री कालिदास अपेट ,अध्यक्ष अनिल राव औताडे, जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ तुवर, शेतकरी युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष डॉक्टर रोहित कुलकर्णी, ऊस परिषद निमंत्रक भदगले त्रिंबक व संयोजक नरेंद्र पाटील काळे, व नेवासा तालुका शेतकरी संघटनेची सर्व पदाधिकारी व ऊस परिषदेस सर्व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
,या कार्यक्रमाच्या वेळेस अनेक शेतकऱ्यांची भाषणे झाली तसेच नेवासा तालुका शेतकरी संघटना आक्रमक नेते त्रिंबक भदगले यांनी राज्य व केंद्र सरकारच्या आडमुठे धोरणाविरुद्ध लवकरच तालुक्यामध्ये मोठे आंदोलन उभे करून केंद्र व राज्य सरकारला त्यांची शेतकऱ्या विषयी असलेल्या भूमिकेबद्दल जाग आणून देऊ तसेच शेतकऱ्याला पाच हजार रुपये प्रति टन ऊसाला भाव मिळवून देऊ कोण म्हणतं भाव देणार नाही ऊसाला पाच हजार रुपये टन भाव घेतल्याशिवाय राहणार नाही अशा आक्रमक स्टाईलने शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारे ऊर्जा निर्माण केली तसेच शेतकरी भावासाठी ऊस कारखानदारांकडून पाच हजार रुपये टन भाव मिळण्यासाठी गणेश चौगुले यांनी आक्रमक भूमिका घेऊन वेगळ्या पद्धतीने भाषण करून शेतकऱ्यांची मन जिंकली व शेतकऱ्यांना पाच हजार रुपये भाव मिळून देण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारे ऊर्जा भरून हात वरती करून टाळ्यांचा कडकडाट शेतकरी ने केला, तसेच बद्री शेठ शिंदे यांनी आपला अनुभव त्रिंबक भदगले यांनी , शेतकऱ्यांसाठी एसटी बसेसच्या काचा फोडल्याचा अनुभव सांगून केलेल्या कामाची प्रशंसा केली तसेच नरेंद्र पाटील काळे यांनी शेतकऱ्याला पाच हजार रुपये टन ऊसाला भाव मिळून देणार असल्याची ग्वाही दिली तसेच विज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना लाईट बिलाविषयी शेतकऱ्यांना शासनाकडून घेणे आहे देणे नाही तर शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे लाईट बिल भरू नये असे या कार्यक्रमाप्रसंगी सांगितले तसेच या कार्यक्रमा प्रसंगी भाऊसाहेब वाघ, अनिल राव ताके पाटील ,वडाळा गावची सरपंच ललित शेठ मोटे, निखिल मोटे , अंकुश काळे पाटील ,पठाडे मामा ,सह पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष त्रिंबक भदगले व कार्यक्रमाचे आयोजक नरेंद्र पाटील काळे यांच्या प्रयत्नाने मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते तसेच भास्करराव तुवर , जिल्हा संपर्क प्रमुख श्री जवरे पाटील, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप, ज्येष्ठ मार्गदर्शक बाबासाहेब खराडे ,किरण लघे, मते विजय, भाऊसाहेब शिवाजी काळे, उर्फ ठाकरे ,दत्तू लांडे ,धनंजय कंक ,अशोक काळे ,मेजर राहुल जावळे , विश्वास मते ,दत्तू पाटील निकम, नामदेव बर्गे ,सागर लांडे , सचिन नागवडे, सोमनाथ औटी, संजय ठूबे, कल्याण मते, सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते