'मुळा'चे पाणी सोडण्यास आ. गडाखांचा विरोध

'मुळा'चे पाणी सोडण्यास आ. गडाखांचा विरोध
घोडेगावात २ नोव्हेंबरला रास्तारोको समन्यायी धोरणानुसार मराठवाड्याला पाणी सोडण्याचा निर्णय
झाल्यामुळे मुळा धरणाच्या कालव्या खालील क्षेत्रात
मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे. पाणी
सोडण्यास तीव्र विरोध होत असून,आमदार शंकरराव गडाख आक्रमक झाले आहेत. या निर्णया विरोधात
(दि.२) सकाळी ९.३० वाजता घोडेगाव येथे रास्ता रोको करण्यात येणार आहे.पाणीवाटप नेवासा तालुक्यातील शेती पूर्णतःमुळा धरणाच्या पाण्यावर अवलंबून
आहे. त्यामुळे मुळाचे पाणी मराठवाड्याला सोडल्यास नेवासा तालुक्यातील शेती पूर्णतः कोलमडून पडणार आहे. मराठवाड्याला मुळाचे पाणी सोडण्याविरोधात व तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी भांडणारे कायम
आक्रमक भूमिका घेणारे आमदार शंकरराव
गडाख यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी ९.३०
वाजता घोडेगाव चौफुला येथे मुळाचे पाणी जायकवाडीला सोडण्याविरोधात
रास्ता रोकोचे आयोजन करण्यात आलेले आहे मराठवाड्याला मुळाचे पाणी सोडण्याविरोधात आमदार गडाखांच्या नेतृत्वाखाली नेवासा तालुक्यातील
शेतकरी, ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत आपले हक्काचे पाणी वाचविण्यासाठी तालुक्यातील
शेतकरी, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने रास्ता रोको आंदोलनास उपस्थितराहावे, असे आवाहन आमदार गडाख मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले
आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.