नेवासा तालुक्यातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचे जामीन मंजूर
नेवासा
तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील खून खटल्यात मनेश उर्फ़ मनोज उर्फ मन्या राधकिसन भद्रे यांच्या वरती 821/2023 भा .द.वि कलम 302,201,व 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की आरोपी ने हातातील लोखंडी कड्याने डोक्यात ,पाठीत मानेवर मारहाण करून गंभीर जखमी करून व रस्त्यावर आपटून पुलाच्या खाली फेकून दिले याबाबत मयत सम्राट यांची प्रकृती गंभीर असताना व्हिडीओ रेकॉर्डिंग केली होती सदर घटनेबाबत ॲडवोकेट संजय अरगडे यांनी खोटा गुन्हा असल्याचा तसेच दारू पिऊन पुला वरून खाली पडून अपघात होऊन त्यास जबरी जखमा झाल्या व त्या मुळे त्याचा मृत्यू झाला असा युक्ति वाद केला मे. जिल्हा सत्र न्यायालयाने कोर्टाने युक्तिवाद ग्राहय धरून आरोपीचा जामीन मंजूर केलं आहे आरोपी च्या वतीने ॲडवोकेट संजय अरगडे ,ॲडवोकेट सुनील अरगडे व ॲडवोकेट निरज नागरे यांनी काम पाहिले .