अहमदनगर
नेवासा तालुक्यातील बॉडी बिल्डर अहमदनगर जिल्ह्यात शरीर सौष्ठ स्पर्धेत चमकले, याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 19 रोजी अहमदनगर येथे जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ,या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील अनेक खेळाडूने सहभाग घेतला होता ,तसेच अहमदनगर जिल्ह्यातील बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये अनेक खेळाडूंनी सहभाग घेऊन या स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता ,तसेच नेवासा तालुक्यातील बॉडी लाईन हेल्थ क्लबचे संस्थापक केतन देशमुख यांच्या व्यायाम शाळेत व्यायाम करणाऱ्या अनेक तरुणांनी सहभाग घेऊन ,सन्मान चिन्ह तसेच प्रमाणपत्र मिळवून नेवासा तालुक्यातील बॉडी लाईन हेल्थ क्लबचे नाव अहमदनगर जिल्ह्यात उंचावले आहे ,तसेच या स्पर्धेचे आयोजक अध्यक्ष अमोल गायकवाड, व सेक्रेटरी मनोज गायकवाड यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती ,तसेच या वर्षाचा नगर महोत्सव श्री ,हा किताब ओंकार कळमकर यांनी पटकावला, बेस्ट पोझर म्हणून राहुल जगताप, मोस्ट इम्प्रूमेंट म्हणून गणेश बोस ,मास्टर श्री रियाज शेख, मेन्स फिजिक राहुल जगताप ,ज्युनिअर श्री अभिजीत चाबुकस्वार ,तसेच नेवासा तालुक्यातील बॉडी लाईन फिटनेस हेल्थ क्लबचे शरीर सौष्ठ स्पर्धेत सहभाग घेणारे, मास्टर श्री साठी भरत कुमार उदावंत ,तसेच निखिल सावंत ,अभिजीत चाबुकस्वार ,शुभम पांढरे ,किरण जांभळकर ,यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्राप्त करून नेवासा तालुक्याचे नाव उंचावले आहे, या स्पर्धेमध्ये पंच म्हणून राष्ट्रीय पंच मनोज गायकवाड ,सोहेल शेख यांनी काम पाहिले, तसेच कार्यक्रमाची सुरुवात नेवासा तालुक्याचे बॉडी बिल्डिंग चे अध्यक्ष ,श्री केतन देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले, या दीप प्रज्वलनाच्या वेळेस माननीय नंदकिशोर रामदिन राष्ट्रीय खेळाडू ,तसेच अहमदनगर अखिल भारतीय समता परिषद शहराध्यक्ष दत्ता शेठ जाधव ,यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला ,तसेच समस्त उपस्थित बॉडी बिल्डिंग चे स्पर्धक व महाराष्ट्रातून आलेल्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धा संपन्न झाली.