अहमदनगर
जिल्हाधिकारी कार्यालय येथे साखर आयुक्त व शेतकऱ्याची बैठक संपन्न याबाबत सविस्तर माहिती अशी की महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना उपाध्यक्ष विधी तज्ञ माननीय अजित काळे साहेब यांच्या उपस्थितीत कलेक्टर व साखर आयुक्त तसेच कारखान्यातील प्रतिनिधी यांच्या समावेत आज तीन ते साडेसात वाजेपर्यंत संध्याकाळपर्यंत चर्चा चालू होती या चर्चेमध्ये अनेक विषय घेऊन त्यांनी झालेल्या चुका निदर्शनास आणून देऊन शेतकऱ्याचे निर्णय घेतले पाहिजे असा आग्रह धरून सदर दोन ते तीन दिवसात योग्य दर देऊन शासन निर्णय प्रमाणे दिला गेला पाहिजे, ऊस दर कमी जर दिला तर शेतकऱ्यांनी ऊसतोड करून दिली नाही पाहिजे त्याचबरोबर रस्त्यावर उतरून कारखानदाराला जाब विचारला पाहिजे त्याचबरोबर माननीय अजित काळे साहेब व शेतकरी संघटनेचे अनेक पदाधिकारी न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सज्ज असून येणारा काळात योग्य दर घेतला शिवाय असे आपण थांबणार नाही असे अजित काळे साहेब यांनी बोलताना सांगितले यावेळी शेतकरी विठ्ठल राजे पवार यावेळी उपस्थित होते ज्येष्ठ मार्गदर्शक शेतकरी संघटनेचे नेते जगन्नाथ कोरडे त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ तूवर तसेच शेतकरी संघटनेची इतर पदाधिकारी उपस्थित होते. शेतकरी संघटना संपर्कप्रमुख नरेंद्र पाटील काळे यांनी मार्गदर्शन केले