........नेवासा तालुक्यात घडली भयानक घटना
नेवासा
रस्ता अडवून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली व जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, या फिर्यादीवरून संजय साहेबराव बहिरट, अनिल साहेबराव बहिरट, सदाशिव पांडुरंग बहिरट,अविनाश नाना कनगारे, विजय अविनाश कनगरे, संतोष अविनाश ,कनगरे, प्रमोद अविनाश कनगरे,राजेंद्र वसंत ,कनगरे या ९ जणांवर भारतीय दंड विधान कलम ३४१, कलम १४३, कलम १४७, कलम ३२३ कलम ५०४, कलम ५०६, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियन कलम ३ (१) (आर)[स] (एस) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की शेजारील भावकीतील इसमांना सोबत घेऊन जाण्यायेण्याचा रस्ता अडवून मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथे घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरून ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत किरण अण्णासाहेब
कनगरे (वय ३७) राहणार घोगरगाव यांनी
फिर्याद दिली ,फिर्यादीत म्हटले की, माझी घोगरगाव येथे कनगरे वस्ती येथे गट २५५ मध्ये राहते घर असून सदर ठिकाणी जाणेसाठी तहसीलदार यांच्या आदेशाने रस्ता
देण्यात आला असून तो आमच्या घरापासून देण्यात आला होता, व सदर शिवरस्ता कनगरे वस्ती या रस्त्याचे दलितवस्ती सुधार योजने अंतर्गत ठराव मंजूर होऊन सदर रस्त्याचे काही प्रमाणात काम झाले होते. परंतु सदर रस्त्याने जाण्यायेण्यापासून आमचे शेजारी संजय बहिरट अनिल साहेबराव बहीरट यांनी मागील तीन ते चार महिन्यांपूर्वी मला जातीवाचक शिवीगाळ केली व तुम्हाला येथून यांनी कोणत्याही प्रकारच रस्ता नाही तसेच वावर सोडून पळून जायला लावू अशी धमकी दिली,अनेकवेळा आमचा जाण्यायेण्याचा रस्ता अडवला सदाशिव पांडुरंग बहिरट याने मला ग्रामपंचायतमध्ये यायचे नाही दलीत वस्ती रस्ता याचे कोणतेही कागदपत्र मागायचे नाही असे म्हणून शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच मागील एक महिन्यापूर्वी सदाशिव बहीरट व ग्रामसेवक घोगरगाव माहिती न देता दलित वस्ती सुधार योजनेतील कनगरे वस्ती ते
शिवरस्ता हा रस्ता ठराव बदलून माझी फसवणूक करून मला विष पिऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. तसेच माझे शेजारील अविनाश नाना कनगरे ,विजय अविनाश कनगरे, संतोष अविनाश कनगरे, प्रमोद अविनाश कनगरे, वसंत नाना कनगरे, राजेंद्र वसंत कनगरे यांनी सर्वांनी सदाशिव बहीरटच्या सांगण्यावरून मला व माझे कुटुबियांना अनेकवेळा मारहाण करून माझी शेती मशागतीची तसेच माझ्या मुलाचा शाळेचा रस्ता अडवून नुकसान केले, मी दलीत वस्ती रस्ता घोटाळा उघड केल्याने सदाशीव बहीरट याने तो प्रकार उघड होऊ नये म्हणून वरील शेजारील भावकीतील इसम यांना सोबत घेऊन मला व माझे कुटुंबाला वेळोवेळी रस्ता अडवून जातीवाचक शिवीगाळ केली व मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले अशी माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.