कॉ.गोविंदराव पानसरे यांचे नातू कॉ.अमित सातपुते यांना लाल सलाम देण्यासाठी नेवासा येथे स्मृती सभेचे आयोजन
नेवासा(प्रतिनिधी)भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते दिवंगत कॉ.गोविंदराव पानसरे यांचे नेवासा येथील नातू दिवंगत कॉ. अमित बन्सी सातपुते यांना अखेरचा लाल सलाम देण्यासाठी नेवासा येथे मंगळवारी दि.३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता स्मृती सभेचे आयोजन पावन गणपती समोरील लक्ष्मी मंगल कार्यालयात करण्यात आले असून या स्मृती सभेला सर्वपक्षीय नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्मृतीसभेचे आयोजक भाकपचे राज्य सचिव कॉ.सुभाष लांडे व बहुजन समाजाचे युवा नेते अँड.संजय सुखदान यांनी केले आहे यावेळी होणाऱ्या आदरांजली सभेला जेष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे,सकाळ वृत्तपत्राचे माजी संपादक उत्तमराव कांबळे,दिवंगत कॉ.अमित सातपुते यांनी देखील आपल्या मातोश्री प्राचार्या कॉ.स्मिता पानसरे व वडील कॉ.अँड.बन्सीभाऊ सातपुते यांच्या पावलावर पाऊल ठेऊन समाज कार्याला सुरुवात केली होती नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली येथील आपल्या शेतीच्या फॉर्म हाऊसवरून नेवासाकडे स्कुटी वरून येत असतांना कॉ.अमित सातपुते यांचा अपघात होऊन मृत्यू झाला होता
अत्यंत मनमिळाऊ व मितभाषी स्वभावगुण असलेल्या कॉ.अमित सातपूते यांच्या अकस्मात मृत्यूमुळे नेवासा तालुक्यात शोककळा पसरली आहे.भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते स्वर्गीय कॉ.गोविंद पानसरे यांचे कॉ.अमित हे नातू असल्याने राज्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी व नेते हे या श्रद्धांजली सभेला उपस्थित राहणार असून होणाऱ्या श्रद्धांजली सभेला सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिकांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन भाकपचे राज्य सचिव कॉ.सुभाष लांडे,अँड.संजय सुखदान,विजय सातपुते यांनी केले आहे