नेवासा
वंचित बहुजन आघाडी कडून नेवासा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे या दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की मा. तहसिलदार साहेब,तथा तालुका दंडाधिकारी साहेब, नेवासा ता. नेवासा जि.अहमदनगर
विषयः १. मराठा समाजाला आरक्षण मिळणेबाबत.
२. स्वस्त धान्य दुकान (पुरवठा) दारिद्रेशेखालील महिला समुह बचत गटाला मिळणेबाबत..
३. रेशन कार्ड असुन ज्यांना अन्न धान्य मिळत नाही. त्यांना तात्काळ अन्न धान्य मिळणेबाबत.
४. प्राथमिक आरोग्य केंद्र, कुकाणा येथे बाळंतपणाची सुविधा (डिलेव्हरी) नाही.
५. ओ.बी.सी. समाजातील आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला
आरक्षण मिळणेबाबत.
६. नेवासा तालुक्यातील अवैध्य धंदे तात्काळ बंद होणेबाबत.
वरील विषयांस विनंतीपुर्वक अर्ज करतो की, आम्ही नेवासा तहसिल कार्यालयासमोर २/११/२०२३
रोजी सकाळी ११ पासुन आम्ही धरणे आंदोलन सुरु करणार आहोत. तरी आपण याची दखल घेऊन
जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील. याची नोंद घ्यावी. या निवेदनावरती जिल्हा उपाध्यक्ष पोपटराव सरोदे , दामोदर शिंदे, उत्तम भी वसकट बाळासाहेब विजय असो शिरसाठ नरेंद्र घोडे चोर कडवळ ससाने अध्यक्ष आबासाहेब शिरसाट गरड साहेब कावरे पाटील कांबळे साहेब सह आदी मान्यवर उपस्थित होते