अहमदनगर
राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंचायत राज आगामी होणाऱ्या निवडणुका जाहीर झाल्या असून निवडणूक आयोगाने याबाबत घोषणा केली असून. यात ग्रामपंचायत सदस्यपदांच्या, तसेच सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवणुकांसाठी ५ नोव्हेंबरला मतदान तर ६ नोव्हेंबरला मतमोजणी होईल. तसेच जिल्ह्यातील१९४ ग्रामपंचातीसह ८२ ठिकाणी पोट निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबर मतदान होणार असल्याची घोषणा निवडणूक आयुक्त यू, पी, एस,मदान यांनी केली आहे. निवडणूका जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात मंगळवार दिनांक ३पासून आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूका होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर या कालावधीत दाखल करावे लागणार आहे. दाखल अर्ज छानणी २३ ऑक्टोबर रोजी,नामनिर्देशनपत्रे २५ ऑक्टोबर दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येईल. त्याच दिवशी चिन्हांचे वाटप होईल. दिनांक ५ नोव्हेंबरला सकाळी ७,३० ते सायंकाळी ५,३० या वेळेत मतदान होऊन दिनांक,६ रोजी मतमोजणी व निकाल असा कार्यक्रम आहे. नेवासा तालुक्यातील मुकींदपूर,भानसहिवरा पानेगाव, देडगाव,पाचेगाव, फत्तेपूर, रस्तापूर, कौठा,शहापूर, पिचडगाव,खुणेगाव, नागापूर, जैनपूर, सौंदळा,पानसवाडी, या गावात निवडणुका होणार आहे