*भोरवाडी ता. अहमदनगर येथे बाजरी शेती दिन उत्साहात साजरा*
श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था, कृषि विज्ञान केंद्र , दहिगाव ने मा. अध्यक्ष आ. डॉ. नरेंद्रजी घुले पाटील ,उपाध्यक्ष मा.आ. चंद्रशेखर घुले पाटील, तज्ञ संचालक डॉ. क्षितीज घुले पाटील आणि सर्व विश्वस्त मंडळ श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था, भेंडे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे.
सद्य परिस्थीतीत पिक पध्दतीत बदलाने खाद्य संस्कृती ही बदलत आहे. मागील काही वर्षामध्ये राज्यात ज्वारी आणि बाजरी या अन्नधान्य पिकाखालील क्षेत्र कमी झाले आहे. या बदलामुळे आपले मुख्य अन्नात ग्लुटेनयुक्त गव्हाच्या चपातीचा वापर मोठया प्रमाणात वाढला आहे. ज्वारी, बाजरी नाही तर चारा नाही, चारा नाही तर जनावरे नाहीत आणि जनावरे नाहीत तर शेतीला शेणखत नाही. अर्थात पिक पध्दतीतील बदलाच्या या फेऱ्यात मानवी आणि मातीचे आरोग्यही बिघडत चालले आहे.
*अधिक लोह व जस्त युक्त जैव संतृप्त बाजरी वाण ए एच बी १२०० चा शेतकऱ्यांनी त्यांच्या आहारात वापर करावा - श्री. नारायण निबे*
अशा परिस्थतीतीमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, इक्रीसॅट संस्था हैदराबाद व अखिल भारतीय समन्वयीत बाजरी सुधार प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने बाजरी पिकामध्ये अधिकतम लोह व जस्त युक्त एएचबी-1200 (AHB 1200 Fe) संकरीत वाण राष्ट्रीय स्तरावर प्रसारीत केले आहे. या वाणांमुळे खाण्यास पौष्टीक आणि आरोग्यदायक बाजरीची भर पडली असल्याने राज्यात बाजरीचे क्षेत्र वाढण्यास हातभार लागेल. असे कृषि विज्ञान केंद्र , दहिगाव ने येथील कृषि विद्या विषय विशेषज्ञ श्री. नारायण निबे यांनी सांगितले.
हे वर्ष जागतिक मिलेट वर्ष साजरे होत असल्याने भोरवाडी तालुका अहमदनगर येथे कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने अंतर्गत ए एच बी १२०० या संकरित वाणाचे प्रात्यक्षिक प्रगतशील शेतकऱ्यांचे शेतावर घेण्यात आले. याचाच एक भाग म्हणून आज भोरवाडी ता. अहमदनगर येथे “बाजरीचे जैव संतृप्त संकरित वाण ए एच बी १२०० ” या विषयावर शेती दिनाचे आयोजन करण्यात आले. शेती दिनानिमित्त शेतकऱ्यांनी बाजरी पिकात वापरलेल्या तंत्रज्ञानाची माहिती दिली. यावेळी सन्मित्र फार्मर प्रोडुसर कंपनीचे संचालक श्री. कृष्णा वामन, श्री. गणेश सानप, पाणी फौंडेशन समन्वयक दिलीप कातोरे तसेच भोर वाडी येथील प्रगतशील शेतकरी अशोक पानसरे, ठाणगे, देवराम भोर, बबन घुले हे उपस्थित होते. श्री. गणेश सानप यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर श्री. विजय भोर यांनी आभार मानले.