नेवासा प्रतिनिधी रमेश राजगिरे
सामाजिक कार्यकर्ते डॅनियल देठे यांचे उपोषण मागे घेण्याची मागणी .पाचेगाव येथील ग्रामपंचायतच्या कारभार विरोधात बसलेल्या डॅनियल व ग्रामस्थ यांचे उपोषण मागे घेण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी त्यांना पत्र दिले आहे त्यामध्ये असे सांगितले आहे प्रति,पंचायत समिती कार्यालय, नेवासा डॅनियल शालूमन देठे आणि ग्रामस्थ मौजे पाचेगाव नेवासा, विषय दिनांक २९/०९/२०२३ पासूनचे सुरू असलेले आपले आमरण उपोषण मागे घेणे बाबत संदर्भ आपलेकडील दिनांक २०/०९/२०२३ चा अर्ज या कार्यालयाने प्रशासक / ग्रा.वि.अ.ग्रामपंचायत कार्यालय पाचेगाव व विस्तार अधिकारी
(पं.स.) नेवासा यांना दिलेले पत्र जा.क्र. वशि /ग्रा.पं./१३०५/२०२३ दि. २५/०९/२०२३
दि. २९/०९/२०२३ पासून या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केलेले आहे. तरी याद्वारे आपणांस कळविण्यात येते की, आपले संदर्भ क्र १ चे अर्जामध्ये नमूद केलेल्या मागण्यांसांदर्भात या कार्यालयामार्फत समिती गठित केली जाईल व त्या समितिकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसांत पुढील कार्यवाही केली जाईल.सबब आपण आपले दि. २९/०९/२०२३ पासूनचे सुरु असलेले उपोषण मागे घ्यावे ही विनंती.
कळावे गटविकास अधिकारीपंचायत समिती नेवासा.