अखेर आमदार शंकरराव गडाखांच्या न्यायालयीन लढाईला यश

अखेर आ. गडाखांच्या न्यायालयीन लढाईला यश
 नेवासा : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नेवासा तालुक्यातील अनेक कामांना स्थगिती राज्यशासनाच्या वतीने देण्यात आली होती. आ. शंकरराव गडाख यांनी
मंत्रीपदाच्या काळात नेवासा तालुक्यातील बजेट मधील 44 कामे 71 कोटी रुपये व अन्य 16 कामे 7 कोटी रुपयांचे, असे एकूण 78 कोटी रुपयांचे मंजूर कामे स्थगितीमध्ये अडकली होती. त्या कामांनाआ. गडाखांच्या प्रयत्नामुळे न्यायालयाने नुकतीच मंजुरी दिली आहे.सदर कामांसाठी आ. गडाख यांनी न्यायालयीन लढाईचा मार्ग अवलंबला होता.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आ. शंकरराव गडाखांच्या वतीने कैलास झगरे, भीमाशंकर वरखडे, रमेश जंगले,ज्ञानेश्वर बोरुडे,बाळासाहेब सोनवणे,भगवान आगळे यांनी सदर कामांची स्थगितीउठवण्यासाठी याचिका दाखल करण्यात
आली होती. सदर याचिका औरंगाबाद येथील
सुनावणी झाल्यानंतर मुंबई उच्च
न्यायालयात मुख्य न्यायमुर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय व डॉ.
आरिफ यांच्या समोर (दि.4) ऑक्टोबर रोजी सुनावणी होऊन शिंदे सरकारने 18 व 21 जुलै 2022 रोजी कामांना स्थगिती देणारा अध्यादेश रद्द केला आहे. सदर
कामावरील स्थगिती उठल्यामुळे लोकांची दळवळणाची होणारी गैरसोय दूर होणार आहे. सदर रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावरून पायी
चालणे कठीण होत होते. परिणामी,अपघाताचे प्रमाण वाढले होते. या कामावरील स्थगिती उठल्यामुळे
विकासकामांना वेग येणार आहे.तसेच तालुक्यातील विविध विकासकामांचे अजूनही 70
ते 80 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे प्रस्ताव शासन दरबारी दाखल असून त्याचा पाठपुरावा आ. शंकरराव गडाख यांच्या मार्फत सुरू आहे. सदर रस्ता कामांची स्थगिती उठल्यामुळे तालुक्यातील विकासकामे जोरधरणार आहेत. आ. गडाख यांनी विशेष प्रयत्नपूर्वक मंजूर केलेली विकासकामांची स्थगिती उठल्यामुळे तालुक्यातील जनतेत समाधानाचे वातावरण पसरले आहे. स्थगिती उठलेल्या कामांमध्ये सोनई ते मोरयाचिंचोरे, घोडेगाव ते मांडेगव्हाण, पानेगाव, हिंगोणी,कांगोनी, बऱ्हाणपुर, चांदा, माका ते महालक्ष्मी हिवरे, मडकी ते देवगड, गोपाळपूर ते खामगाव, जेऊर हैबती ते ताके वस्ती, खुपटी ते पुनतगाव, चिंचबन,भानसहिवरे मारुतीतळे ते औरंगाबाद महामार्ग,सलाबतपूर ते दिघी, भेंडा ते गेवराई, घोगरगाव
जुने ते नवे घोगरगाव, वाकडी फाटा ते वाकडी,माळीचिंचोरे ते कारेगाव,माका ते वाघोली,मुकींदपूर ते मक्तापूर, शिंगवेतुकाई ते महामार्ग,उदुमाला ते निपाणी निमगाव व इतर कामांचा यामध्ये समावेश आहे.आमदार गडाख यांना रस्त्याचे श्रेय मिळवु नये, यासाठी तालुक्यातील विरोधकांनी स्थगिती मिळावी, यासाठी प्रयत्न केले. मात्र आ . गडाख यांनी न्यायालयीन लढाईसाठी वारंवार मुंबई, छत्रपती संभाजीनगर येथे खेटा मारल्या. संबंधित वकील अधिकारी यांच्याशी  पाठपुरावा केला.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.