महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट कुकाणा गाव कडकडीत बंद,कुकाणा येथे भव्य मोर्चा व निषेध.
नेवासा
महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट कुकाणा गाव कडकडीत बंद,कुकाणा येथील एका तरुणाने महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रसारित केल्याने या घटनेच्या निषेधार्थ , विविध हिंदुत्ववादी संघटनेने कडकडीत कुकाना गाव बंद ठेवून निषेध व्यक्त केला उत्स्फूर्तिने व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला व भव्य मोर्चामध्ये सहभागी झाले ,भव्य मोर्चा हिंदुत्ववादी संघटनांकडून शिस्तबद्ध रित्या काढण्यात आला यावेळेस जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम ,या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता . या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून निषेध करण्यात आला आहे,या बंदमध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटना सहभागी झालेल्या होत्या . महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर टाकून प्रसारित केल्यामुळे अशा माथेफिरु व्यक्तींविरुद्ध कारवाई करून कायदा व सुव्यवस्था अबधित ठेवण्यासाठी पोलिसांनी अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचून काढण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनेकडून करण्यात आली आहे तसेच निवेदन देण्यात आले आहे.