नेवासा तालुक्यातील ऐसाम शिलेदार याची महाराष्ट्र राज्याच्या बास्केट बॉल संघात निवड.
नेवासा
नेवासा बुद्रुक येथील रहिवाशी ऐसाम शिलेदार याची महाराष्ट्र राज्याच्या बास्केट बॉल संघात निवड झाली . युथ गेम काऊन्सिल ऑफ इंडिया यांचे वतीने दिल्ली येथील राजीव गांधी स्टेडियम मध्ये दी.२६ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यास महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.ऐसाम हा नेवासा येथील ॲड.सादीक शिलेदार याचा चिरंजीव आहे.
तो १० वी वर्गात श्रीरामपूर येथील सेंट झेवियर्स या शाळेत शिक्षण घेत असून श्रीरामपूर बास्केट बॉल असोसिएशन चे संघा तर्फे महाराष्ट्रातील विविध शहरात झालेल्या स्पर्धामध्ये त्याने उत्तम कामगिरी केली आहे. त्यास श्रीरामपूर येथील मुज्जफर शेख यांचे कोच म्हणून मार्गदर्शन मिळत आहे. निवडी निमित्ताने नेवासा वकील संघाचे ज्येष्ठ सदस्य ॲड.पांडुरंग माकोने यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ॲड.अध्यक्ष कैलास कापसे व संघाच्या इतर सदस्य यांचे वतीने सत्कार करणेत आला त्यावेळी सर्वश्री ॲड.ज्ञानेश्वर जाधव, ॲड.अशोक करडक ॲड.पारस नहार , ॲड.संदीप शिरसाठ , ॲड. जमीर शेख , ॲड.गोरख काकडे, ॲड.सागर चव्हाण,ॲड.संदीप कोतकर, ॲड.इर्शाद सय्यद, ॲड.राजेंद्र पंडित, ॲड.राहुल मुंगसे, ॲड.भताने , ॲड. ॲड.संदीप शिंदे, ॲड. सुदाम ठुबे , ॲड.चंद्रकांत कदम, ॲड.देशमुख आदी.उपस्थित होते. या निवडी बदल नेवासा तालुक्यातील सर्व थरातून स्वागत होत आहे