नेवासा तालुक्यातील सुरेगांव गंगा येथील अल्पभुधारक शेतकरी तहसिल कार्यालय नेवासा येथे उपविभागीय अभियंता सुरेश दुबाले,ज्युनिअर इंजिनीयर बी.टी.सोनवणे व जेसीबी चालक यांचे विरोधात उपोषणास बसले आहेत,उपोषणकर्तेंची वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष हरिशदादा चक्रनारायण व जिल्हाउपाध्यक्ष पोपट सरोदे यांनी भेट घेऊन सदर घटना जाणुन घेतली व उपोषणकर्ते यांना जाहीर पाठींबा दिला, यावर त्यांनी तहसीलदार यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, आमच्यावर सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय नेवासा फाटा हे आमच्यांवर केलेल्या अन्यथा विरुध्द
उपोषण करीत आहेत दिनांक दोन रोजी दिलेले निवेदनात त्यांनी असे म्हटले
आम्ही विनंती पुर्वक अर्ज करतो की, नेवासा सुरेगाव (गंगा) डांबरी रोडवर आजपर्यंत कित्येक वेळा त्याचे डांबरीकरण व काम झाले परंतु, आजत गाजत कधीही सव्र्व्हे नंबर २८ मध्ये कोणताही नाला अथवा पुल नाही, पाऊसाचे पाणी जाण्याचा कोणताही प्रवाह नाही तरी पण उपविभागीय अभियंता श्री दुबाले साहेब व ज्युनियर इंजिनिअर बी टी सोनवणे साहेब हे दिनांक रोजी नेवासा सुरेगाव रोडवरील सर्व्हे २८ च्या ठिकाणी जे, सी,बी घेवुन आले व त्या ठिकाणी नळया टाकण्यास चालु केल्या, आम्ही सर्व शेतकऱ्यांनी त्यांना विनंती केली की हया ठिकाणी पुर्वीचा कोणताही नाला नाही
नळया नाही तरी आपण कोणताही नविन प्रवाह तयार करून आमच्या २० ते २५ शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान करू नका, आम्ही सर्व शेतकरी अल्पधारक आहोत,तसेच तेथे कोणताही वाद झाला नाही अथवा अडथळा केला नाही, तरी सुध्दा हया अधिकाऱ्यांनी आमच्यावर नेवासा पोलीस
स्टेशन मध्ये कलम ३२३ अन्वये खोटया केसेस दाखल केलेल्या आहेत, तसेच त्य दिवसाचे
चे पुर्ण व्हिडीओ चित्रिकरण आमच्याकडे आहे त्यात कोणतीही धक्का बुक्की,शिवीगाळ
झालेली नाही, तरी आम्ही जे १५ ते २० वर्षापुर्वी शेतामध्ये बांधलेल्या घरामध्ये पाणी जावुन त्यांचे खुप मोठे नुकसान होणार व आम्ही त्यामुळे बेघर होणार व आमच्या शेतात जाणारा रस्ता सुध्दा राहणार नाही व
दळण वळणाचे पुर्ण मार्ग बंद होतील,तसेच दिनांक १४ नंतर दिनांक एक रोजी पण हे जेसीबी सह हे परत आले आले व आम्हांला वारंवार येवुन त्रास देत आहे,आमच्यावर होत असलेल्या अन्यायामुळेआम्ही उपोषण करत आहे पोलीस स्टेशनला खोटा गुन्हा दाखल केला हयांनी ६ ते ७ दिवसांनी विचारपुर्वक
संगतमताने खोटया केस साठी वेळ घालवून गुन्हा केलेला आहे,राजकिय दबावापोटी आमच्यावर यांनी खोटा गुन्हा दाखल केलेला आहेआहे, तरी आमच्यावर जो अन्याय केलेला आहे खोटया केसेस केलेल्या आहे नविन पाण्यांचा प्रवाह तयार करून आमच्या कधीही भरून न निघणारे नुकसान, होवुन शेती खराब होवुन आम्ही वंचित होणार व झालेल्या रस्त्याच्या नित्कृष्ट कामाची चौकशी संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी म्हणून, हया झालेल्या अन्याया विरूध्द नेवासा तहसिल कार्यालया समोर उपोषणास आम्ही सर्व बसलो आहेत