नेवासा
खडका फाटा येथील पतंजली कंपनीत काम करणाऱ्या बाहेरच्या राज्यातील लोकांची काही दिवसापूर्वी लुटमार करण्यात आली होती यावरून त्या व्यक्तीने नेवासा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती त्या फिर्यादीमध्ये त्यांनी असे म्हटले होते की
ता.30/7/2023 रोजी रात्री 10.00 वा.चे सुमारास यातील फिर्यादी व साक्षीदार अवधेश कुमार शुभकरण पाल असे पतंजली कंपनीतील त्यांचे काम संपवुन पायी हॉटेल नंदनवनमध्ये असलेल्या त्यांचे रुमकडे पायी जात असताना त्यांचे पाठीमागुन मोटारसायकलवरुन आलेल्या तीन अनोळखी चोरटयांनी त्यांना थांबवुन फिर्यादी व साक्षीदार यांना तुम चोरी करके आये हो असे म्हणुन दोन इसमांनी फिर्यादी व साक्षीदार यांना पाठीमागे येवुन त्यांचे हात धरुन तीसऱ्या अनोळखी ईसमाने तुम्हारे पास क्या है निकालो असे बोलुन फिर्यादीस चापटयाने मारुन फिर्यादीचे हातातील 10,000-00 रु.कि.चा ओपो कंपनीचा मोबाईल हिसकावुन घेतला व खिशांची झडती घेवुन शर्टचे वरचे खिशातुन आधारकार्ड काढुन घेतले तसेच साक्षीदार अवधेशकुमार यांचे गळयातील सोन्याचे ओम पान बळजबरीने तोडुन चोरुन नेले आहे अशा फिर्यादीवरुन नेवासा पो.स्टे. I गु.र.नं. 801/2023 भादविक.392,34, प्रमाणे ता.31/7/2023 रोजी दाखल करण्यात आलेला असुन गुन्हयाचा तपास पो.स.ई.एस.जी.ससाणे नेवासा पो.स्टे. हे करीत होते सदर गुन्हयाचे तपासाकरीता सदर गुन्हयाचे तपासाकरीता मा.श्री.राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक अहमदनगर, मा.श्री.प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधिक्षक साहेब श्रीरामपुर, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री.सुनिल पाटील साहेब शेवगांव यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे व मा.पोलीस निरीक्षक श्री.शिवाजी डोईफोडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पो.स.ई.एस.जी.ससाणे , ,पो.स.ई.श्री.ढाकणे , तपास पथकाचे पोकॉ.शाम गुंजाळ,पोकॉ.सुमित करंजकर, व नेवासा पो.स्टे.चे पोकॉ.अंबादास जाधव,अपर पोलीस अधिक्षक कार्यालयातील पोना.सचिन धनाड,पोकॉ.आकाश भैरट असे तपास करत असताना तपासादरम्यान ता.7/8/2023 रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशिर बातमीवरुन यातील जब्बार सिकंदर पिंजारी वय 24 रा.लक्ष्मीनगर नेवासा यास गुन्हयाचे चौकशी कामी पो.स्टे.ला आणुन त्याचेकडे चौकशी करता त्याने मी व माझ्या साथीदारांनी खडका शिवारातील बंद पडलेल्या सिमेंट फॅक्टरीसमोरुन दिनांक 30/7/2023 रोजी दोन बिहारी लोकांकडुन चोरलेला ओपो कंपनीचा मोबाईल शरिफ अकबर पठाण रा.पोलीस लाईन जवळ गंगानगर नेवासा यास विकलेला आहे असे सांगीतले.त्यानंतर शरीफ अकबर पठाण यास गुन्हयाचे तपासकामी पो.स्टे.ला बोलावुन त्याचेकडे चौकशी करुन सदर गुन्हयात चोरीस गेलेला मोबाईल 10,000-00 रु.कि.चा ओपो कंपनीचा A 57 हिरव्या रंगाचा मोबाईल त्याचा IMEI नंबर 863581069081896असा असलेला सिम कार्ड नसलेला गुन्हयाचे तपासकामी पंचनामा करुन जप्त करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.आरोपी अटक केलेला आहे.
सदर गुन्हयातील ईतर आरोपीतांची नांवे लवकरात लवकर निष्पण्ण करुन गुन्हयातील चोरीस गेलेला ईतर माल सोन्याचे ओम पान व आधारकार्ड पोलीस स्टेशनची कर्मचारी आरोपीकडून चौकशी करत आहे.