*नेवासा शहरात बंद घराचे कुलूप तोडून धाडसी चोरी*


नेवासा शहरात बंद घराचे कुलूप तोडून धाडसी चोरी
■ चार तोळे सोन्याचे दागिने व १०० ग्रॅम चांदीसह रोख २५ हजार रुपये लंपास
नेवासा -
 बंद घराचे फुलूप तोडून आत प्रवेश करुनसुमारे चार तोळे सोन्यासह १०० ग्रॅम चांदीच्या वस्तू व रोख २५ हजार रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना नेवासा शहरात घडली. याबाबत दाखल फिर्यादीन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत प्रभा प्रकाश मोदी (वय४८) धंदा मजुरी. रा. नेवासा खुर्द यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, मी व माझा मुलगा स्वप्नील असे
आमचे नातेवाईकांना भेटणेकरीता सकाळी ९ वाजण्याचे सुमारास आमचे राहते घराला कुलुप लावून जळगाव
ता. जि. जळगाव येथे गेलो होतो.त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ च्या सुमारास माझा भाचा ओंकार
माणिक मापारी याने फोन करुन सांगितले की, तुमच्या घराचा दरवाजा उघडा आहे. तेव्हा मी त्याला घरामधे
जावून खात्री करणेस सांगितले असता त्याने मला सांगितले की, घरातील सामानाची उचका पाचक झालेली
असून सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसते आहेत. तेव्हा आमचे घरी चोरी झाल्याचे आमचे लक्षात आले.
त्यानंतर मी व माझा मुलगा स्वप्नील जळगावहून नेवासा येथे आमचे घरी येवून पाहीले असता आमचे घराचे
दरवाजाचे कडी-कोयंडा तुटलेला दिसला. मी व मुलगा स्वप्नील असे आम्ही घरात जावून पाहीले असता
माझे दागीने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे दिसून आले.
चोरीस गेलेले दागिने व रोख रकम पुढीलप्रमाणे- ९ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, एक तोळ्याचे(१० ग्रॅम) एक सोन्याचे लॉकेट, ८ ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे नेकलेस, ६ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पळ्या, दोन
ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या नथी दीड ग्रॅम बजनाचे सोन्याचे २५ मणी,अडीच ग्रॅम वजनाच्या पाच सोन्याच्या
अंगठ्या, दोन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या चाळ्यांच दोन जोड, १०० ग्रॅम ( दहा भार ) वजनाच्या चांदीच्या
वस्तू, २५ हजार रुपयांची रोख रक्कमअसे एकूण ४१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १०० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू व २५ हजार रुपयांची रोख रक्कम
असा ऐवज चोरून नेला.या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांरिवेधात भारतीय दंड
विधान कलम ४५४, ४५७, ३८०प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल केलाआहे. पुढील तपास नेवासा पोलिस करीत आहेत.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.