*प्रेस क्लब चे अध्यक्ष मोहन गायकवाड यांचा वाढदिवस शरणपूर वृद्ध आश्रमात साजरा.

*प्रेस क्लब चे अध्यक्ष मोहन गायकवाड यांचा वाढदिवस  शरणपूर वृद्ध आश्रमात साजरा.
-------------------------------------------------------------------------
वाढदिवसानिमित्त  जेष्ठ पत्रकारांच्या हस्ते स्नेहभोजन , व पावसाळी छत्री वाटप . 
-------------------------------------------------------------------------
नेवासा तालुका (प्रतिनिधी) 
 नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड  यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या खर्चाला फाटा देत समाज प्रति असलेली जाणीव दाखवत आज आगळा वेगळा उपक्रम करत वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन खडका फाटा रस्त्यावरील शरणपूर वृद्ध आश्रमात जेष्ठ पत्रकार बांधवांच्या हस्ते वयोवृद्ध आजी आजोबांना स्नेहभोजन व पावसाळी छत्री वाटप करून अनोख्या पध्दतीने वाढदिवस साजरा केला. 
यावेळी यावेळी व्यासपीठावर प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष गुरूप्रसाद देशपांडे ,शरणपूर वृद्ध आश्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब देवखिळे, एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण पुरोहित, केंद्रीय पत्रकार संघाचे राज्य प्रभारी कमलेश गायकवाड, जेष्ठ पत्रकार अशोक डहाळे, कैलास शिंदे, उपस्थित होते. 
यावेळी वयोवृद्ध नागरिकांना  एक मदतीचा हात म्हणून  प्रत्येक वेक्तीने वाढदिवस ,वर्षश्राद्ध, तसेच विविध कार्यक्रम प्रसंगी समाजातील आधार नसलेल्या वर्गाला मदत होईल म्हणून आश्रमातील वेक्तींना साहित्य अथवा अन्नदान स्वरूपात  मदत करावी असे आव्हान यावेळी गुरुप्रसाद दशपांडे यांनी केले.
 मोहन गायकवाड यांच्या  सामाजिक उपक्रमा बद्दल त्याचे सर्व स्थारतून अभिनंदन केले जात आहे समाजातील गोर गरीब नागरिक व  वंचितांच्या हितासाठी नेहमी अग्रेसर असतात प्रेस क्लबच्या माध्यमातून शैक्षणिक, व सामाजिक, कार्य अश्या विविध ठिकाणी समाज सेवेच्या हेतूने ते नेहमीच काम करतात तसेच आश्रमातील सध्य स्थिती बद्दल पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सविस्तर माहिती दिली 

कार्यक्रम प्रसंगी पत्रकार शाम मापारी, मकरंद देशपांडे, रमेश शिंदे,सुहास पठाडे, शंकर नाबदे, गणेश दारकुंडे, कुणाल मांडण, सामजिक कार्यकर्ते इम्रानभाई दारूवाला,  पोलीस पाटील राम शिंदे, दिलीप गायकवाड, तर गृह रक्षक दलाचे अशोक टेमकर, अल्ताफ शेख, अरुण देवढे , गफार शेख, उमेश इंगळे यांच्या सह मोठ्या संख्येने नागरिक  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्रमाचे मार्गदर्शक पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले तर आभार रावसाहेब मगर यांनी मानले .
-------------------------------------------------------------------------
चौकट-- 
माणुसकीच्या नात्याने आपण देखील कुठंतरी समाजाचं  देणं लागतो मी देखील सामान्य कुटूंबातील तरुण आहे प्रेस क्लबच्या माध्यमातून गोरगरिब  गरजू वतांना जितकी मदत करता येईल तितकी करतोच आज वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून दिवभरतात समाज उपयोगी उपक्रम केले याचे मनस्वी समाधान वाटते. 
   मोहन गायकवाड 
प्रेस क्लब अध्यक्ष. नेवासा

-------------------------------------------------------------------------
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.