*सरकारचे शासन आपल्या दारी पण आदिवासी बांधव शासनाच्या दारी जाऊनही त्याच्यावर अन्याय*
कोपरगाव
दिनांक 3 ऑगस्ट रोजी चासनळी येथील रेणुका गांगुर्डे हिचा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर /परिचारिका आणि वाहन चालक यांच्या हलगर्जीपणा व मुजोरपणामुळे प्रस्तुतीदरम्यान आदिवासी समाजातील रेणुका गांगुर्डे हिचा योग्य ट्रीटमेंट न केल्याने बळी गेला.
या घटनेच्या निषेधार्थ आज कोपरगाव तालुक्यात एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य प्रणित भिल्ल असोसिएशन- संस्थापक मंगेश भाऊ औताडे यांच्या नेतृत्वाखाली आज कोपरगाव तहसील कार्यालयावर भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते यावेळेस मोर्चाला संबोधित करताना नगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनी आदिवासी समाजाबद्दल शासनाच्या ढिसाळ कारभाराबद्दल खंत व्यक्त केली.आज स्वातंत्र्य मिळवून देशाला 76 वर्ष झाले तरीही सरकार आदिवासींच्या बाबतीत गांभीर्याने घेत नाही चासनळी येथे आरोग्य केंद्राच्या हलगर्जी व मुजोरपणामुळे प्रस्तुतीदरम्यान रेणुका गांगुर्डे या आमच्या भगिनीचा मृत्यू झाला.
याला सर्वस्वी जबाबदार त्या आरोग्य केंद्राच्या डॉक्टर परिचारिका आणि ॲम्बुलन्स चालक जबाबदार आहेत. त्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाले पाहिजे.
म्हणून अण्णाभाऊ स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला म्हटले होते ये आजादी झुटीं है देश कि जनता भुकी है!आजही आमचा आदिवासी दलित बांधव उपाशी आहे ही स्वतंत्र भारताची अवस्था असेल तर हे दुर्दैव आहे
शासनाच्या अनेक योजना पासून आदिवासी बांधव वंचित बघायला मिळतो भिल्ल वास्त्यांची अवस्था आजही आहे तशीच आहे.
तरीपण आमचं आरक्षण डोळ्यात खुप्त
म्हणून रेणुका गांगुर्डे यांनी जन्म दिलेल्या बाळाला सरकारने बाळ संगोपन योजनेचा फायदा पुरेपूर देऊन त्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी
त्या बाळाची शिक्षणाची पूर्ण जबाबदारी शासनाने घ्यावी
अशी मागणी ही राजेंद्र वाघमारे यांनी केली.
जर सरकारने या कुटुंबाला तात्काळ न्याय दिला नाही तर काँग्रेसचे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही
यावेळी आंदोलनास मोठ्या संख्येने जिल्ह्यातून आदिवासी बांधव उपस्थित होते.
यावेळी या जनआक्रोश मोर्चाचे आयोजक मंगेशभाऊ औताडे, सांस्कृतिक काँग्रेसचे प्रदेश सचिव चंद्रशेखर पाटील कडू, कोपरगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत बागुल,अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय जाधव, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष यादव अण्णा त्रिभुवन, काँग्रेस सेवा दलाचे ज्ञानेश्वर भगत, तालुका उपाध्यक्ष सोपान धेनक,मयत रेणुका गांगुर्डे यांच्या आई वडील भाऊ, आणि जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आदिवासी बांधव यावेळी उपस्थित होते