गडाखाने स्वतःचा नाकारते पणा झाकण्यासाठी सरकार व आमच्यावर खापर फोडण्याचा केविलवाणी प्रयत्न... माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे
नेवासा
आज नेवासा येथे पत्रकारांशी बोलताना स्वतःचा नाकारते पणाचे व अपयशाचे खापर सरकारवर व माझ्यावर फोडण्याचा विद्यमान आमदारांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. चार वर्षात केलेल्या विकास कामाचे बोर्ड लावण्या ऐवजी सरकार निधी देत नाही म्हणून जनतेची सहानुभूती मिळवण्याचे व आपले अपयश झाकण्याचे विद्यमान आमदारांचे मुख्य उद्देश दिसते. विद्यमान आमदारांनी चार वर्षाच्या कार्यकाळात विकास न करता फक्त विरोध संपवण्यासाठी जनतेला विठीस धरून जिरवा जीरवीचे राजकारण आतापर्यंत केले आहे. माझ्या कार्यकाळात मंजूर कामावर आयत्या पिठावर रेगोट्य मारणे व त्याची उद्घाटन करणे यातच माजी आमदार कार्यक्षम आहे. जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदारसंघातील आमदारांना निधी मिळतो व तुम्हालाच मिळत नाही याचा अर्थ पाठपुरावा करण्यात आपण आपयशी ठरत असून त्याचे खापर माझ्यावर व सरकारवर फोडत आहे. मंत्री पदाला शोभेल अशी कामे तालुक्यातील जनतेला दाखवावी, बॅनर बाजी करून रडीचा डाव आमदार गडाखानी खेळू नाही . बॅनर बाजी करून आभाळाकडे पाहत फोटो काढून काही होत नसते, निधी आणण्यासाठी पाठपुरावा करावा लागत असतो.आपण विधिमंडळात मतदारसंघातील सर्व सर्वसामान्य जनतेच्या हिताचे किती प्रश्न विचारले ? जलजीवन मिशन आसेल तालुक्यातील पाणी योजना अडचणीत आणण्याचे काम गडाखनी केले. शासन आपल्या दारी कार्यक्रमांमध्ये अडचणी आणण्याचे काम गडाख यांनी केले .मी आमदार असताने मंजूर झालेल्या कामांचे फुकटचे श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न गडाखनी केला .विकासकामांचे बोर्ड फाडण्याचे काम गडाखांच्या कार्यकर्त्यानी केले .माझे त्यांना जाहीर आव्हान आहे की आपण हा खटाटोप थांबवा अन्यथा जनता आपल्याला जाब विसरल्याशिवाय राहणार नाही .
मागील अडीच वर्षात महाआघाडीचे सरकार होते त्यात गडाख हे मंत्री होते त्या अडीच वर्षात या वर्षात आपण काय काम केले याचा बोर्ड लावा.आमदारांना दर वर्षी पाच कोटी रुपयांचा निधी मिळतो मागील चार वर्षात वीस कोटी रु. मिळाले मग तो निधी आपण कुठे खर्च केला. आपण हे जनतेसमोर मांडावे. आपले भुलभुलय्या आता चालणार नाही क्युकी पब्लिक सब जानती है.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी नगरसेवक सुनील वाघ प्रदेश निमंत्रित सदस्य निरंजन डहाळे ओबीसी मोर्चाचे तालुका अध्यक्ष देविदास साळुंखे शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रतीक शेजुळ, भारत गुंजाळ, अजित नरोला बाळासाहेब क्षीरसागर अजित पवार आदी उपस्थित होते