*अखेर नेवासा तालुक्यातील प्रतिष्ठित लोकांच्या व नामदार शंकरराव गडाख यांच्या मध्यस्थीने सुरेगांव (गंगा) येथील पीडित विठ्ठल मच्छिंद्र शिंदे व इतर शेतकऱ्यांनी उपोषण स्थगित केले.*

*अखेर नेवासा तालुक्यातील प्रतिष्ठित लोकांच्या मध्यस्थीने सुरेगांव (गंगा) येथील पीडित विठ्ठल मच्छिंद्र शिंदे व इतर शेतकऱ्यांनी उपोषण स्थगित केले.*
*दि. १०/०८/२०२३.*
*नेवासा प्रतिनिधी:-*
मागील चार दिवसापासून सुरेगांव(गंगा) येथील शेतकरी तहसील कार्यालय नेवासा येथे उपोषणास बसले होते. *सार्वजनिक बांधकाम विभागाचे नेवासा तालुका उपविभागीय अभियंता यांच्या चुकीच्या धोरणा विरोधात सुरेगाव( गंगा) येथील शेतकरी आपल्या मुला-बाळासह मागील चार दिवसापासून तहसील कार्यालय नेवासा येथे उपोषणास बसले होते.
*सविस्तर वृत्त:-*  सुरेगाव (गंगा) ते नेवासा रस्त्यावर कोणताही नाला व पूल नसतांना देखील नाला तयार करून पाण्यासाठी नवीन प्रवाह सुरू करण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाने केल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी शेतात पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात आमच्या शेतीचे व पिकांचे नुकसान होणार आहे म्हणून नाल्याला व नळ्यांना विरोध करून या भागातील शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात गेल्या चार दिवसापासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू ठेवले होते.
*या उपोषण स्थळी पहिल्याच दिवसापासुन  वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष हरीश दादा चक्रनारायण व कार्यकर्त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांची व्यथा जाणून उपोषणकर्ते पीडित शेतकरी यांना जाहीर पाठिंबा दिला होता व उपोषण आपल्या हाती घेऊन न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.*
*सुरेगाव (गंगा) येथील डांबरी रोडवर आजपर्यंत कित्येक वेळा काम झाले होते परंतु कधीही या रस्त्यावर कोणताही नाला व फुल नव्हता व नाही,*

*२०१८ साली मंजूर झालेल्या सुरेगाव (गंगा) ते नेवासा रस्त्याच्या इस्टिमेंट मध्येही नाल्याचा व पुलाचा किंवा कोणत्याही नळ्या टाकण्याचा उल्लेख नव्हता व नाही.पावसाचे पाणी जाण्याचा कोणताही प्रवाह नाही तरी पण सार्वजनिक बांधकाम विभागाचे नेवासा तालुका उपविभागीय अभियंता दुबाले साहेब व ज्युनिअर इंजिनियर सोनवणे साहेब हे दिनांक 14 जुलै 2023 रोजी सुरेगाव (गंगा) ते नेवासा रोडवरील गट नंबर 28 च्या ठिकाणी जेसीबी घेऊन आले व त्या ठिकाणी नळ्या टाकण्याचे काम सुरू केले होते.*
*यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी विनंती केली की या ठिकाणी पूर्वीचा कोणताही नाला नाही किंवा फुल नाही तरी आपण कोणताही नवीन प्रवाह सुरू करून आमच्या जमिनीचे व पिकांचे नुकसान करू नका.परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता दुबाले साहेब व ज्युनिअर इंजिनियर सोनवणे साहेब यांनी शेतकऱ्यावर  धाक व दहशत तयार करून व पोलीस फोर्स फाटा बोलावून शेतकऱ्यांना धमकवण्याचे काम केले होते व नेवासा तहसीलदार यांनी कोणतीही माहिती न घेता शेतकऱ्यांनाच गुन्हे दाखल करण्याची धमकी देखील दिली होती, पुढे झालेही तसेच दुबाले साहेब व सोनवणे साहेब यांनी शेतकऱ्यावर दबाव आणून नेवासा पोलीस स्टेशनमध्ये ३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला.*
*त्यामुळे सुरेगाव (गंगा) येथील शेतकऱ्यांना नेवासा तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसावे लागले होते,पोलीस निरीक्षक डोईफोडे साहेब सोडले तर या उपोषणाला तहसीलदार संजय बिरादार यांनी फारसे गांभीर्याने घेतले नव्हते.दि.०७/०८/२०२३, रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष हरीश दादा चक्रनारायण व कार्यकर्ते जेव्हा तहसीलदार यांना भेटले तेव्हा कुठे ते सायंकाळी उपोषणकर्ते यांना भेटण्यासाठी आले होते व पाच मिनिटे भेट घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यांनी दिलेले पत्र दाखवून व आम्ही आमचे काम केले आहे आता तुम्ही पोलीस निरिक्षक यांना भेटुन संबधितांवर गुन्हे दाखल करा असे सांगुन निघून गेले होते.त्यानंतर चौथ्या दिवसापर्यंत म्हणजे दि.१०/०८/२०२३ पर्यंत तहसीलदार संजय बिरादर हे पुन्हा उपोषणकर्ते यांच्याकडे परत फिरकलेच नाहीत.याचा वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष हरिश चक्रनारायण यांनी जाहीर निषेध केला होता व वरिष्ठांकडे त्यांच्या बदलीची मागणी करणार असे म्हंटले होते*
*आज दि.१०/०८/२०२३,रोजी नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख साहेब यांच्या वतीने मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तूवर,ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना भेंडा संचालक काकासाहेब शिंदे,अॅड. आबासाहेब देशमुख(कुकाणा)अॅड.बाळासाहेब शिंदे,( सुरेगाव-गंगा), राहुल राजळे पि.ए.(लोहगाव), सुनील जाधव पि.ए.(नेवासा),यांनी उपोषणकर्ते पीडित शेतकरी यांची उपोषणाच्या चौथ्या दिवशी भेट घेऊन उपोषण सोडवण्यासाठी मध्यस्थी केली.*
*यावेळी उपोषणकर्ते पीडित शेतकरी यांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष हरिशदादा चक्रनारायण,अंकुश शिंदे (माजी सरपंच सुरेगाव -गंगा), रा.स.प.चे सुनील शिंदे (सुरेगाव-गंगा).यांनी उपोषणकर्ते यांची बाजू मांडली व मध्यस्थी केली.*
*असा निघाला तोडगा:- नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख साहेब यांच्या वतीने आलेले प्रतिनिधी व उपोषण करते पीडित शेतकरी यांचे वतीने आलेले प्रतिनिधी यांचे समोर उपोषणकर्ते शेतकरी यांनी सांगितले की आमच्या जमिनीचे व पिकांचे नुकसान होणार नाही व आमच्यावर अन्याय होणार नाही याची तुम्ही मध्यस्थांनी काळजी घ्यावी.*
*वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष हरीशदादा चक्रनारायण यांनी म्हटले की सुरेगाव-गंगा ते नेवासा रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांची हद्द कायम करून रस्त्याच्या पश्चिम बाजूने पानसनाला वढ्यापर्यंत चर खोदून पाण्याची योग्य व कायमची विल्हेवाट लावावी म्हणजे दोन्ही बाजुच्या शेतकर्यांना न्याय मिळेल व कोणावरही अन्याय होणार नाही.*
*आमदार शंकरराव गडाख साहेब यांच्या वतीने आलेले मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर साहेब व प्रतिनिधी यांनी उपोषण करते शेतकरी यांना शब्द दिला की तुमच्या शेतीचे व पिकांचे कोणतेही नुकसान होणार नाही.*
*१.)रस्त्याच्या पश्चिम बाजूने दक्षिण-उत्तर असा चर खोदून व दगडी पिचिंग करून पाण्याची योग्य विल्हेवाट लावून देऊ व तुमच्या पिकांचे व शेतीचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेऊ.*
*२.) सुरेगाव-गंगा ते नेवासा रस्त्याचे बंद पडलेले काम सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगून पूर्ण करून देऊ.*
*३.) सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता दुबाले साहेब यांनी शेतकऱ्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्यासाठी सांगू*
*असे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्ते शेतकरी व मध्यस्थ यांनी ते मान्य केले व तहसीलदार यांनी येऊन उपोषण सोडवावे असे ठरले.परंतु तहसीलदार नेवाशात नसल्यामुळे व तसेही तहसीलदार यांनी उपोषणकर्त्यांना फारसे गांभीर्याने न घेतल्यामुळे त्यांची वाट न पाहता उपोषणकर्ते शेतकरी यांनी मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर व वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष हरीशदादा चक्रनारायण यांच्या हस्ते पाणी व चहा घेऊन उपोषण स्थगित केले.*
*उपषणकर्ते शेतकरी:-*
*१.) सुरेश शिंदे,२.)विठ्ठल मच्छिंद्र शिंदे,३.)बाबासाहेब शेषराव शिंदे,४.)दत्तात्रय शिंदे,५.)कल्याण शिंदे,६.) योगेश शिंदे,७.)सुरज शिंदे,८.) वैशालीताई शिंदे,९.)शालनताई शिंदे,१०.) किर्तीताई शिंदे,११.)ज्योतीताई शिंदे,१२.)अनुराधाताई शिंदे,१३.)श्रुतीताई शिंदे आदी. उपोषण करते शेतकरी यांनी उपोषण स्थगित केले.*
*या उपोषणाच्या चार दिवसांमध्ये जवळपास सर्वच उपोषणकर्ते-शेतकरी व लहान मुला-बाळासह सर्वांनांच डोळयांची बाधा होऊन डोळे आले होते.नेवासा येथील वैद्यकीय अधिकारी व टिमने उपोषणकर्त्यांची नियमीत येऊन काळजी घेतली तसेच पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे व टिमने उपोषणकर्ते यांना चोख बंदोबस्त दिला होता व उपोषणकर्ते यांची वैद्यकिय तपासणी कामी नेवासा सरकारी हॉस्पिटला पोलीस निरिक्षक यांनीच कळविले होते त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष हरिशदादा यांनी संबधीत विभागाचे आभार मानले.*
*यावेळी उपोषण  सोडवण्यासाठी मध्यस्थी. उपोषणाचा प्रचार प्रसार करणारे .*
 *१.)मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर साहेब,*
*२.)वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष हरीशदादा चक्रनारायण,*
*३.)ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक काकासाहेब शिंदे,*
*४.)अॅड.आबासाहेब देशमुख,*
*५.) अॅड. बाळासाहेब शिंदे,*
*६.)पी.ए. राहुल राजळे साहेब,*
*७.)पी.ए. सुनील जाधव साहेब,*
*८.)माजी सरपंच सुरेगाव- गंगा अंकुश शिंदे साहेब,*
*९.)रासपचे सुनील शिंदे साहेब,*
*१०.)पत्रकार मकरंद देशपांडे.*
*११.)पत्रकार सुधीरभाऊ चव्हाण,*
*१२.)पत्रकार मोहन गायकवाड,*
*१३.)बादल परदेशी,(प्रिन्स महाराष्ट्र न्युज)*
*सर्वच मान्यवरांचे सुरेगाव- गंगा येथील उपोषणकर्ते शेतकरी यांनी मनापासुन आभार मानले.*
उपोषण सोडल्यानंतर सुरेगाव-गंगा येथील शेतकरी, माता-भगिणी यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष हरिशदादा चक्रनारायण यांचे विशेष आभार मानले व एक आठवण म्हणुन फोटो काढतांना ...
दि.०७/०८/२०२३ उपोषणाच्या पहिल्या दिवशी उपोषणकर्ते शेतकरी यांची भेट घेऊन संवाद साधतांना वंचित बहुजन आघाडी नेवासा ता.अध्यक्ष हरिशदादा चक्रनारायण व वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष  पोपटराव सरोदे.उपोषण सोडल्यानंतर उपोषणकर्ते-शेतकरी यांनी पोलीस प्रशासनांचे मानले आभार.
Tags

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.