नेवासा
नेवासा फाटा येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे मित्र मंडळाच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी जयंती निमित्ताने अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमा प्रसंगी मोठ्या संख्येने युवक वर्ग उपस्थित होता यावेळेस अनेक मान्यवरांची भाषणे झाली
पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे असे आवाहन माननीय श्री नगरसेवक जितू भाऊ कुऱ्हे यांनी यावेळी बोलताना केले यावेळी स्वप्निल भाऊ डिब्बे अमोल भाऊ शिंदे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ अध्यक्ष राहुल गाडे उपाध्यक्ष राम शिरसाट भाऊसाहेब कनगरे लखन शिरसाट संदीप भूमकर शिवराज पीटेकर विजय पवार विशाल धनवटे विशाल पिटेकर कैलास लष्करे विकास लष्करे जगदीश कुसळकर किरण त्रिभुवन अमोल साबळे अभिषेक त्रिभुवन सिद्धार्थ कनगरे उपस्थित होते यावेळी स्वप्निल भाऊ डिब्बे व अमोल भाऊ शिंदे यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची यांचे जीवन कार्य आपल्या भाषणातून विशद केले यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे की जय असा जयघोष करत उपस्थित युवकांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल गाडे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले