विश्व हिंदू परिषदेकडून उंबरे गावातील लव जिहाद प्रकरणांचा सखोल चौकशी करण्याची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांचेकडे मागणी
नेवासा
(राहुरी) अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील उंबरे गावात क्लासच्या नावाखाली धर्मांतराचं रॅकेट चालवल्याचं उघडकीस आलंय. क्लासच्या नावाखाली अल्पवयीन हिंदु मुलींना लव्ह जिहादच्या चक्रव्युहात अडकवण्याचा प्रयत्न चालू होते.
उंबरे गावातील एक मुस्लिम शिक्षिका कोचिंग क्लास घेते. मात्र ईदसारख्या सणांना ही शिक्षिका हिंदू मुलींची दुस-या मुस्लिम मुलांसोबत ओळख करुन देत सेल्फी काढायची व नंतर हेच फोटो मॉर्फ करुन तसंच चुकीच्या पद्धतीने वापर करुन मुलींना ब्लॅकमेल केलं जात असे. पण हा प्रकार कोणाला सांगू नये म्हणून धमकीही दिली जात होती.मात्र एका अल्पवयीन हिंदु मुलीने धाडस दाखवून घरी हा सर्व प्रकार सांगत पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर आणखी दोन मुली पुढे आल्यात. याप्रकरणी महिला शिक्षिकेसह चौघांना अटक करण्यात आलीय. तर आणखी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
तरी हा प्रकार लक्षात घेता, महाराष्ट्र शासनाने लव जिहाद विरोधी कठोर कायदा आणावा व उंबरे गावातील या प्रकरणांतील मुस्लिम शिक्षिकेसह सर्व आरोपींना कडक शिक्षा होणे प्रकानी कार्यवाही करावी. ही नम्र विनंती केली. यावेळी जिल्हामत्री श्रीकांत नळकांडे, प्रखंड मंत्री प्रशांत बहिरट, सार्थक परदेशी, उमेश ठाणगे, शुभम गव्हाणे आदी उपस्थित होते.