घोडेगाव प्रतिनिधी
ज्ञानमाऊली विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली
घोडेगाव मंगळवार दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी ज्ञानमाऊली इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना सुधाकर पानसांबळ सर म्हणाले, दोन्हीही थोर नेत्यांचे आपल्या संस्कृतीला फार मोठे योगदान आहे व त्या नेत्यांप्रमाणे आपण जीवन जगावे व तसेच बनावे याविषयी मार्गदर्शन त्यांनी केले. त्यासाठी परिश्रम आणि श्रद्धा आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रतिमा पुजन कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकर पानसंबाळ, शाळेच्या प्राचार्य सि.क्विनीटा व सेक्रेटरी सि. निलमनी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी शाळेतील कल्याणी पटेकर व तन्वी सोनवणे यांनी भाषणे केली. सि. क्विनीटा यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सार्थक झाडे याने केले तर उत्कर्ष राठोड यांने आभार मानले. सर्व विद्यार्थी व शिक्षक हजर होते. बारगळ सर यांनी कार्यक्रमाचे आयोजन नियोजन केले तर कार्यक्रम घडवून आणण्यासाठी विद्या मॅडम, राजू पटेकर मामा, किरण ब्राम्हणे मामा, सुरज आल्हाट व मंदा माऊशी यांनी सहकार्य केले...