नेवासा BSNL बीएसएनएल कार्यालयाचा मनमानी कारभार
नेवासा
एकीकडे भारतभर संचार सेवेसाठी प्रसिद्ध असणारी बीएसएनएल कंपनी आपल्या ग्राहकाला सेवा देत असते परंतु या उलट चित्र नेवासा तालुक्यात ग्राहकांना अनुभव येत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की नेवासा तालुक्यातील भारत संचार निगम लिमिटेड कार्यालया च्या कर्मचाऱ्यांकडे वरिष्ठ कार्यालयाची दुर्लक्ष असल्यामुळे नेवासातील कार्यालयाचे कर्मचारी मुजोर व मनाला वाटेल तेव्हा आम्ही काम करू अशा प्रवृत्तीचे बनल्याचे तक्रार नेवासा तालुक्यातील अनेक BSNL ग्राहकांकडून येत आहे याची पुनर्वृत्ति माळीचिंचोरा परिसरात नवीन वायफाय कनेक्शन साठी नेवासा येथील बीएसएनएल च्या कार्यालयाला माहिती देऊन तीन महिने उलटले वेळोवेळी कार्यालयात जाऊन सांगितले तर काही वेळेस कर्मचारी नेहमी कार्यालयात हजर नसतात याचा अनुभव अनेकदा आला तरी अद्याप पर्यंत कनेक्शन न दिल्यामुळे ग्राहकाने संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याशी फोनवर संपर्क साधून विचारण् केली असता प्रभारी कर्मचारी उडवा उडवीचे उत्तरे देऊन काम करण्यास टाळाटाळ करण्याचा अनुभव ग्राहकाला येत आहे यावरून संबंधित कर्मचारी यांच्या विरोधात तक्रार करणार असल्याचे त्या ग्राहकाने सांगितले आहे