तालुक्याला निधी कमी पडू देणार नाही...माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे
नेवासा ता.
उस्थळ दुमाला येथील पांडुरंग महाराज मंदिरात ब्लॉक बसविणे तसेच ग्रामपंचायत परिसरामध्ये पेव्हिंग ब्लॉक या कामांचा लोकार्पण सोहळा आज तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी अंकुशराव काळे बाळासाहेब भदगले दादा वाघ अनिल गायकवाड मनोज पारखे देविदास साळुंके अशोक टेकणे अण्णा गव्हाणे यांचे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आमदार मुरकुटे म्हणाले की मागील अडीच वर्षात संपूर्ण तालुका दहशतीखाली होता गुंडागर्दी दादशाही हुकुमशाहीच्या पलीकडे सत्ताधाऱ्यांनी तालुक्यात काहीच केले नाही. गेली अडीच वर्षात नेवासा तालुक्याला भकास करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. मागच्या अडीच वर्षात तालुक्यात एकही विकास काम दिसून येत नाही सरकार बदलल्यानंतर प्रलंबित कामांना मंजुरी मिळण्यास सुरुवात झाली आहे त्यातूनच हे सर्व काम होत आहे. तालुक्याचे विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ही ग्वाही यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिली. जनतेची कामे करण्यासाठी पद व सत्ता लागत नाही लागते ती फक्त मानसिकता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यंत्री अजितदादा पवार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्यातून हे सर्व घडत आहे त्यामुळे तालुक्यातील जनतेला आता निधीची काळजी करण्याची गरज नाही तालुक्याला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी तालुक्यातील विरोध जिवंत ठेवा असेही आमदार मुरकुटे यांनी यावेळी सांगितले.यावेळी कैलास दहातोंडे बाळासाहेब क्षिरसागर तुळशीराम झगरे येडूभाऊ सोनवणे अमोल दिघे ज्ञानेश्वर पेचे नानासाहेब ढेरे राशिनकर संभाजी जगताप संभाजी जनाभाऊ जाधवसुनील पतंगे विवेक ननवरे रामराव भदगले प्रताप चिंधे सह आदी मान्यवर उपस्थित होते