*कृषि विज्ञान केंद्र दहिगाव - ने यांना उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार*


*कृषि विज्ञान केंद्र दहिगाव - ने यांना उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार*
    भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली चे कृषि तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्था, पुणे  यांच्या वतीने आयोजित विभाग - ८ अंतर्गत वार्षिक  क्षेत्रीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक २८ ते ३० जुलै २०२३ दरम्यान  छत्रपती संभागीनगर येथे करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात व गोवा या तीन राज्यातील  ८२ कृषि विज्ञान केंद्रे सहभागी झाली. यावेळी केव्हीके  दहिगाव – ने चे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी केलेल्या  सादरीकरणास उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
      यावेळी  श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र दहिगाव – ने यांनी सन २०२२ मध्ये केलेल्या  कामाचे  सादरीकरण प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी केली. त्यांनी केलेल्या सादरीकरणास डॉ. इंद्रमनी मिश्रा, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, डॉ. एस.के.रॉय, संचालक आईसीएआर - कृषि तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्था, झोन ८, पुणे, डॉ. जगदीश राणे, संचालक, आईसीएआर – केंद्रीय कोरडवाहू फलोत्पादन संशोदन संस्था, बिकानेर, डॉ लाखनसिंग, माजी  संचालक आईसीएआर - कृषि तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्था, झोन ८, पुणे, डॉ. डी.बी. देवसरकर, संचालक, विस्तार शिक्षण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या शुभहस्ते उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ. नरेंद्रजी घुले पाटील, मा.आ.श्री. चंद्रशेखर घुले पाटील, मा.आ.श्री. पांडुरंग अभंग, संस्थेचे सचिव श्री अनिल शेवाळे, श्री. रवींद्र मोटे व संस्थेच्या सर्व विश्वस्त मंडळाने  डॉ. कौशिक व केव्हीके च्या सर्व स्टाफ  यांचे अभिनंदन केले. 
       कृषि विज्ञान केंद्र दहिगाव – ने यांनी माहिती तंत्रज्ञान साधनांचा (आई.सी.टी.) वापर करत  क्वी.आर.कोड द्वारे तयार केलेले एकूण १४ माहितीपत्रकांचे विमोचन डॉ. पी दास, माजी उपमहासंचालक (कृषि विस्तार), आईसीएआर, नवी दिल्ली, डॉ. व्ही.व्ही. सदामते, माजी सदस्य नियोजन आयोग, नवी दिल्ली, इंद्रमनी मिश्रा, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, डॉ. शरद गडाख, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख  कृषि विद्यापीठ, अकोला, डॉ. झेड.सी.पटेल, कुलगुरू, नवसारी कृषि विद्यापीठ, नवसारी, (गुजरात ) डॉ. आर.रॉय बर्मन, सहायक महासंचालक (कृषि विस्तार), आईसीएआर, नवी दिल्ली, डॉ. एस.के.रॉय, संचालक आईसीएआर - कृषि तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्था, झोन ८, पुणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. तसेच केव्हीके दहिगाव – ने यांच्या वतीने लघु दुग्ध उत्पादक शेतकरी या पुस्तकाचे विमोचन डॉ. ए.यु. भिकाने, संचालक, विस्तार शिक्षण महाराष्ट्र पशु व मस्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर, डॉ. एन.बी. जाधव, संचालक, विस्तार शिक्षण, जुनागड कृषि विद्यापीठ, जुनागड (गुजरात ), डॉ. एन. बी.उंदिरवाडे,  संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. पंजाबराव देशमुख  कृषि विद्यापीठ, अकोला, डॉ. एस.के.रॉय, संचालक आईसीएआर - कृषि तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्था, झोन ८, पुणे व डॉ. श्यामसुंदर कौशिक, प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ, केव्हीके दहिगाव –ने यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.