ज्यांच्यावर ३०२ चे गुन्हे, त्यांना बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं डील, राऊतांचा सनसनाटी आरोप

मुंबई : महाराष्ट्रातल्या अनेक तुरुंगातल्या खतरनाक गुन्हेगारांशी मुख्यमंत्री कार्यालयातून संपर्क साधला जातोय. ज्यांच्यावर ३०२ सारखे गंभीर गुन्हे आहेत, त्यांना बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून डील सुरु आहे. २०२४ च्या निवडणुकीआधी त्यांना जामिनावर सोडण्याचं षडयंत्र रचलं जात आहे, असा सनसनाटी आरोप करुन लवकरच मी यासंबंधीचे पुरावे जाहीर करेन, असं शिवसेना खासदार म्हणाले.खासदार संजय राऊत यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन गृहमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. कलंक या शब्दावरुन भाजप उद्धव ठाकरे यांच्यावर करत असलेल्या टीकेला राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. फडणवीसांचं ज्या पद्धतीने राजकारण सुरु आहे, ते एकप्रकारे कलंकच आहे, असा पुनरुच्चार राऊत यांनी केला. त्याचवेळी तुरुंगात असलेले गुन्हेगार आणि मुख्यमंत्र्यांच्या कथित डीलवरुन राऊतांनी गंभीर आरोप केला.मुख्यमंत्री कार्यालयाचं गुन्हेगारांबरोबर डीलिंगसंजय राऊत म्हणाले, निवडणुकांपूर्वी महाराष्ट्रातील अनेक तुरुंगात असलेल्या गंभीर गुन्हेगारांना मुख्यमंत्री कार्यालयातून संपर्क केला जात आहे. निवडणुकांपूर्वी त्यांना जामिनावर सोडण्यासाठी सीएमओमधील माणसं त्यांना जाऊन भेटत आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाचं गुन्हेगारांबरोबर डीलिंग सुरु असताना गृहमंत्री फडणवीस काय करत आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. तुरुंगाच्या दारात बैठका होतायेत मुख्यमंत्री कार्यालयातून कसे फोन जातायेत? कुणाला कुठं भेटायला पाठवलं जातंय? कुठे बैठका होतायेत? अगदी तुरुंगाच्या दारात, आतमध्ये... आतमध्येही फोन आहेत. गृहमंत्र्यांना मुख्यमंत्री कार्यालयावर लक्ष ठेवायला सांगा मग त्यांना कळेल की मुख्यमंत्री कार्यालयात कशी अंडरवर्ल्डची टोळी चाललेली आहे, असंही राऊत म्हणाले.कलंक या शब्दाचा फडणवीसांना राग आला, पण त्यांनी न रागावता आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत. तुम्ही आमचं काय वाकडं करणार आहात, जे काही करायचं ते करुन झालंय. आपण घटनात्मक पदावर बसलेला आहात, तुम्ही आमच्या प्रश्नांना उत्तरे दिलीच पाहिजे. आमने सामने येऊन लढा, आम्ही जे सांगतोय ते महाराष्ट्राच्या हितासाठी सांगतोय. महाराष्ट्राचा कलंक पुसला जावा म्हणून सांगतोय. तुमच्या गृहखात्याचा नाकावर टिच्चून काय चाललंय? हे लवकरच मी उघड करतो, असा इशाराही संजय राऊत यांनी फडणवीस यांना दिला.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.