झाड तोडताना मध्ये आल्याच्या रागातून दोन  महिलांना कोयत्याने मारून धमकी  

अहमदनगर/प्रतिनिधी – घराजवळील झाड तोडण्यास अडथळा आल्याच्या रागातून शेजारी राहणाऱ्या दोन महिलांना शिविगाळ  दमदाटी करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कोयत्याने हातावर मारून जखमी केले. हि घटना एमआयडीसी परिसरातील रेणूकानगर येथील जिमखानामागे घडली. 
या बाबतची माहिती अशी कि  प्रतिभा दुर्गेश शेळके ( राहणार जिमखान्यामागे रेणुकानगर ) या त्यांच्या घराच्या अंगणात झाडु मारत असताना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या संपत निवृत्ती भोर व त्यांची पत्नी यांनी प्रतिभा शेळके यांनी पेटवलेला कचरा विझवला व घरात जावुन हातात झाड तोडण्यासाठी कोयता व कु-हाड घेवुन परत बाहेर आले व झाड तोडु लागले. त्यावेऴी प्रतिभा शेळके  व त्यांची जाऊ अशा मध्ये गेल्या असता संपत भोर  यांनी प्रतिभा शेळके यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाऴ करून त्यांचे हातातील कोयत्याने झाड तोडत असताना प्रतिभा शेळके या मध्ये. गेल्याचा राग आल्याने त्यांनी त्याचे हातातील कोयत्याने सौ. शेळके यांचे डावे पायाचे बोटावर मारले. त्यात त्यांचे पायाला जखम झाली. संपत भोर यांनी त्यांना तुम्ही परत जर या जागेत परत आले तर तुम्हाला सर्वानां मारून टाकू असे म्हणुन जिवे मारण्याची धमकी दिली.
 या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी  प्रतीभा दुर्गेश शेऴके, ( वय 30 वर्षे रा.जिमखान्यापाठीमागे, रेणुकानगर,अहमदनगर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संपत निवृत्ती भोर, त्यांची पत्नी व मुलगा ( नाव माहीत नाही. सर्व रा. जिमखान्यापाठीमागे, रेणुकानगर,, अहमदनगर ) यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कायदा  कलम 324, 323, 504, 506  प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास पोलीस उप निरीक्षक टिक्कल करीत आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.