नेवासा
नेवासा तालुक्यातील स्वर्गवासी शरद भाऊ चक्रनारायण यांचे पुणे येथील पाहुणे नेवासा येथे श्रीमती चक्रनारायण यांचे जावई नातवाला भेटायला येत असताना पुणे येथून लांबचा प्रवास करून येत असताना अहमदनगर जिल्ह्यातील पांढरीचा पूल येथील नामांकित शिवनेरी भेळ खाण्यासाठी जरा विश्रांती म्हणून थांबले असता पुढील प्रवास करण्यासाठी घाई गडबडीने ते त्या हॉटेल मधून निघून गेले तेव्हा ते नेवासा येथे आल्यावर लक्षात आले की आपली पर्स हरवली आहे आणि त्या पर्समध्ये एक लाख रुपये किमतीच्या सोन्याच गंठण व रोख रक्कम होती होती काही वेळेतच शिवनेरी हॉटेलचे मालक शांताराम पालवे यांचा फोन आला व श्री चक्रनारायण यांना ते म्हणाले की आपली परस हरवले आहे का त्यावर श्री प्रमोद चक्र नारायण म्हणाले की हो हॉटेल मालक पालवे यांनी आपला हॉटेल शिवनेरी येथे तुमची पर्स राहिली आहे व त्यात सोन्याचे गंठण रक्कम आहे यावर प्रमोद चक्रनारायण व दिपेंद्र भैया ठाकूर पांढरीचा पुल शिवनेरी हॉटेल येथे गेले असता हॉटेलचे मालक पालवे यांनी त्यांना ती पर्स दिली त्यामध्ये सोन्याचे गंठण व रोख रक्कम जसाच्या तशी होती यावर पुणे येथील रहिवासी श्री प्रमोद चक्रनारायण यांनी हॉटेल मालकाच्या इमानदारीचे कौतुक केले व आजच्या कलियुगात देवरूपी व नावाजलेल्या शिवनेरी हॉटेल चे सर्व स्टाफ चे कौतुक करून फोटो काढले आज सुद्धा या जगात इमानदार माणसं आहे असे म्हणून आभार व्यक्त केले.