नेवासा फाटा .
नेवासा येथे काही काळ कायदा व सुव्यवस्था कर्तव्यदक्षपणे आपली कामगिरी करणारे नेवासा पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल ते पोलीस उपनिरीक्षक पदी बाळकृष्ण ठोंबरे निवड झाल्यानंतर सध्या बाबळेश्वर येथे नियुक्ती असणारे व आपली कर्तव्यदक्ष रित्या कामगिरी करणारे अशी ओळख असलेले जनतेचे प्रश्न नेहमी सोडवणारे पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे हे नेवासा फाटा येथून जात असताना नेवासा तालुक्यातील अनेक गोरगरिबांचे प्रश्न सोडवल्यामुळे मुकिंदपुर नेवासा फाटा येथील ग्रामस्थ व विविध संघटनांनी त्यांचा सत्कार नेवासा फाटा येथे सागर हॉटेल येथे करण्यात आला शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन ठोंबरे यांचा सत्कार माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव सुखदेव सरोदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळेस ग्रामस्थांनी त्यांना शुभेच्छा दिल्या या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते यावेळेस विराट प्रतिष्ठान च्या वतीने सागर भाऊ सरोदे यांनी त्यांचे स्वागत केले तसेच सुकाणू समितीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच संदीप सरोदे विकास रक्ताटे भारत सरोदे राजू सरोदे विशाल सरोदे विकास कडवे सह आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते