पुणे शहरातील श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्या वतीने आयोजित श्री साईबाबांची पालखी पुणे - ते शिर्डी नगर महामार्गावरून मार्गस्थ झाली. यावेळेस साई भक्तांनी पालखीच्या रथाचे दर्शन घेऊन नतमस्तक झाले पुणे ते शिर्डी महामार्गावरून पालखी मार्गस्थ होताना मोठ्या प्रमाणात भक्तगणांनी यावेळेस पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती प्रत्येक चौका चौकात
पालखीचे स्वागत अनेक मान्यवरांनी केले हा पालखी सोहळा पुणे येथून 22 जून ते 03 जुलै असा 11 दिवसाचा हा पालखी सोहळा शिर्डीला पोचणार आहे. अनेक वर्षाची श्री साई पालखी सोहळ्याची परंपरा मोठ्या आनंदाने प्रत्येक वेळेस साजरा केला जातो यावर्षी श्री साई पालखी सोहळ्याला
34 वर्ष पूर्ण झाली असून पालखी सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहे या पालखी सोहळ्याचे
अध्यक्ष - श्री. गुरुप्रसाद दगडू पगडे.सचिव - श्री.महावीर पद्माकर श्रीसागर.खजिनदार- श्री. विजय दत्तात्रय मेथे.