देडगांव येथील 188 शेतकऱ्यांच्या पोट खराब्याचा विषय मार्गी..माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे
देडगाव
देडगाव येथे 188 शेतकऱ्यांच्या पोट खराब्याचा विषय मा.नामदार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मदतीने मा.जय हरी आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला.देडगाव येथील १८८ शेतकऱ्यांच्या पोटखराबा क्षेत्राचा विषय हा खूप वर्षापासून प्रलंबित होता. त्यामुळे शेतकऱ्यांना सदरील जागेवर कुठल्याही प्रकारचे कर्ज घेता येत नव्हते.त्यामुळे असंख्य अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत होते. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील यांच्याकडे देडगाव मधील शेतकरी वर्गाने त्यांच्या अडचणी मांडल्या. व लगेच माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मा.नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मदतीने पोट खराबा दुरुस्ती करून आणल्याबद्दल व 188 शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे उतारे लवकरच मिळणार असल्याने शेतकरी वर्ग व देडगाव ग्रामस्थांच्या वतीने मुरकुटे त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कामदार आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील यांच्या कामावर प्रभावित होवून श्री उद्धव मुंगसे पाटील (ग्रामपंचायत सदस्य देडगाव) व श्री कारभारी मुंगसे पाटील (माजी चेअरमन देडगाव) यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. व नेवासा तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीच्या विकास रथात सामील झाले. यावेळी आकाशभाऊ चेडे, शहादेव मुंगसे, पोपटराव बनसोडे, रामचंद्र कदम,संभाजी काजळे,राजेंद्र कदम, आकाश हिवाळे, उद्धव नांगरे, हरिभाऊ तागड, हरिभाऊ कदम ,निलेश कोकरे ,महेश कदम, श्रावण औटी ,विजय अंधारे ,अशोक मुंगसे, मिनीनाथ मनसे ,प्रेमचंद हिवाळे, किरण मस्के, चांगदेव तांबे, अशोक तांबे ,लक्ष्मण तांबे ,खडेश्वर तांबे ,जालिंदर तांबे ,लखन भताडे, दिलीप कुसळकर, गोपाळ कुसळकर, पवार पोपट तसेच समस्त ग्रामस्थ व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.