*शिंगणापूर पोलिसांची कारवाई कत्तलीसाठी नेली जात असलेली ९ वासरे पकडली*

कत्तलीसाठी नेली जात असलेली ९ वासरे पकडली
सोनई
नेवासा तालुक्यातील सांगवी म्हाळस ते पिंपळगाव रस्त्यावर २६ जुलै रोजी छोटा हत्ती टेम्पोमध्ये ९ वासरे
कत्तल करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना पकडली असून शिंगणापूर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत शिंगणापूर पोलीस स्टेशनकडून समजलेलीमाहिती अशी की सांगवी ते म्हाळस पिंपळगाव रस्त्यावर२६ रोजी रात्री ९ वाजता
छोटा हत्ती टेम्पो (एमएच १६ सीसी ३६६७) मध्ये ९वासरे घेऊन जात असताना आढळून आली.शिंगणापूरठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल पोलीस बी. के. फुलमाळी यांच्या फिर्यादीवरून अलम शरफुद्दीन शेख (वय २६)रा. घोडेगाव, मोबीन दाऊद शेख (वय ३९) रा. चांदा या
दोघांवर शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर
१५१/२०२३ प्रमाणे महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारित)
अधिनियम १९९५ चे कलम ५ (ब) (क) सह प्राण्यांना
क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम
११, मो.वा.का.१९२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.