माळीचिंचोरा येथे अपंगाला मारहाण, माळचिंचोला येथील राहणारे कुंडलिक कुदळे या अपंग व्यक्तीला मारहाण केल्याचा प्रकार माळीचिंचोरा येथे घडला आहे ,याबाबत त्यांनी नेवासा पोलीस स्टेशन येथे फिर्यादी*


माळीचिंचोरा येथे अपंगाला मारहाण, माळचिंचोला येथील राहणारे कुंडलिक  कुदळे या अपंग व्यक्तीला मारहाण केल्याचा प्रकार माळीचिंचोरा येथे घडला आहे ,याबाबत त्यांनी नेवासा पोलीस स्टेशन येथे फिर्यादी
 आहे त्या फिर्यादीमध्ये त्यांनी असे सांगितले आहे की ,दिनांक 29 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मी माझा भाऊ संतोष याच्या घरी चहा पिण्यासाठी गेलो होतो ,मी व संतोष चहा पीत असताना तेथे आमच्या गावातील नितीन अहिरे हा घरासमोर नशा करून आला ,व बडबड करायला लागला तेव्हा मी त्याला विचारले तू इथे का आला तेव्हा त्याला मी बोलण्याचा राग आला व त्याने मला लंगड्या असे म्हणून विनाकारण शिवीगाळ केली, मी त्याला समजावून सांगत असताना त्याने तेथे पडलेला दगड उचलून घेऊन माझ्या डोक्याला मारून मला खाली पाडले ,तेव्हा माझा भाऊ व पत्नी सविता ह्या  मला सोडवायला आल्या असता त्याने माझ्या भावाला दगडाने मारहाण केली व पत्नीला वाईट वाईट शिवीगाळ केली , तसेच मला व माझ्या कुटुंबातील लोकांना जीव ठार मारण्याची धमकी दिली आहे ,यानुसार नेवासा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे भारतीय दंड संहिता कलम 324 , कलम 504, कलम 506, कलम 2016 सुधारित अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम  ,92 ऐ तसेच कलम अपंग व्यक्तीचा अधिकार अधिनियम 2016 ,92 b  अन्वे नेवासा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविण्यात आली आहे, याप्रमाणे पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे,  यावेळेस अपंग जनता दल संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष जाकिर भाई शेख  व शेंडगे साहेब  तसेच अपंग जनता दल संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी नेवासा पोलीस स्टेशन येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.