अखेरीस विहीर खोदणार्या परप्रांतीय टोळ्यांची बनवेगीरी उघड..
दोन दिवसापूर्वी मी परप्रांतीय विहीर खोदाई करणाऱ्या टोळ्या शेतकऱ्यांना कशा प्रकारे फसवत आहेत याची पोस्ट केली होती. कारणही तसेच होते,माझ्या सहकार्याने शेतात विहीर खोदाई चे काम अशाच एअखेरीस विहीर खोदणार्या परप्रांतीय टोळ्यांची बनवेगीरी उघड..
का टोळीला १५ दिवसापूर्वी दिले होते. त्यांनी आगोदर आम्हाला ठोस रक्कम किती होईल हे सांगीतले मात्र वर्क ऑर्डर घेताना तो ऊल्लेख न करता त्यांनी ५५ रू घनफुटाचा ऊल्लेख आम्हाला करायला लावला. खरतर विहीरीचा वरील व्यास - खोली व तळाचा व्यास याचा घनफुटात आम्ही विचारच केला नव्हता. किंबहुना तो कुणीच करत नाही. इथेच फसवणुकीचा पाया रचला जातो.तुमचा खर्च दुप्पट-तिप्पट केला जातो. विहीरचा तळ जाणीवपुर्वक मोठा ठेवला जातो अर्थात घनफूटात (Cubic foot) हे गणित प्रचंड बदलते. 1/3× पाया × H ( R2+r2+R×r) या सूत्रानुसार प्रती घनफुट ५०/- हा विहीरीचा खर्च तिप्पट होतो. मात्र तो रितसर परसावर ( ७ फुटचा १ परस ) असा झाल्यास साधारणतः १२००० फुटा प्रमाणे येतो. हे गणित सामान्य शेतकऱ्याच्या आकलना बाहेर जाते.
काल याबाबत वेल्हे पोलीस स्टेशनला समंधीत परप्रांतीय टोळीला बोलावून घेतले.तत्पुर्वी पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता मा. डुबल साहेब यांनी घनफुटाचे मोजमापाचे गणित मला दिले. सबब परस व घनफुटातील फसवेगिरी उघड झाली. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांचे पितळ ऊघडे पडले.हिशोब दुरूस्त करून तब्बल 2.5 लाख त्यांनी लगेच विनातक्रार कमी केले.
अशा परप्रांतीय टोळ्या पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर फिरत असुन याबाबत शेतकऱ्यांनी सतर्क राहून विहीरीचे काम द्यावे. ही मंडळी विहीरीचे काम अर्ध्यावर आले की, वेगळा हिशोब मांडून भांडायला ऊठतात, शेतकऱ्यांच्या अंगावर जातात. सबब विहीरीचे काम परस किंवा फुटामधे द्यावे. चुकूनही घनफुटात काम देऊ नये. विहीरीच्या तळाचा घेर वरिल घेरा पेक्षा माफक (कमी) घ्यावा.सर्व गणित तिथेच फसते. जितका तळाचा घेर मोठा तितकी फसवणुक मोठी!! म्हणुनच आगोदरच एकुन रक्कमेचा लेखी करार करावा. अन्यथा तुमची फसवणुक अटळ आहे.
या प्रकरणी समंधीतांना तंबी देऊन सोडले असले तरीही आपण फसणार नाही याची काळजी घ्यावी. वेल्हे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार साहेब, पोलीस कुदळे साहेब तसेच पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता मा. डुबल साहेब यांच्या सहकार्यामुळेच हा घोळ ऊघडकीस आला.त्यांचे मनःपूर्वक आभार.!!
( हि पोस्ट जास्तीत जास्त शेतकर्यापर्यंत पोहचवू या! )
माऊली दारवटकर
राष्ट्रशक्ती संघटना.