भालेराव या युवकाचा जातीयवादी गावगुंडांनी निर्गुण खून केल्या प्रकरणी न्याय हकासाठी नेवासा तहसील कार्यालयावर येथे सर्व पक्षीय
सामाजिक कार्यकर्ते यांचे निदर्शने ...!
June 08, 2023
नेवासा
बोंढार हवेली या गाव व जिल्हा नांदेड या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेराव या युवकाचा जातीयवादी गावगुंडांनी पुर्वनियोजीत कट कारस्थान करुन निर्गुण खून केला आहे.या प्रकरणामध्ये संबंध महाराष्ट्र मध्ये संतापाची लाट उसळली आहे.
*याच कारणास्तव नेवासा शहर व तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष हरिशदादा चक्रनारायण,बहुसन समाज पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विकास चव्हाण,भिमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभुदास कांबळे,व कांग्रेसचे नेवासा शहर अध्यक्ष रंजन जाधव,* यांच्या वतीने व युवक सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षातील नेते, यांनी सर्वांनी एकत्र येऊन मा. तहसीलदार संजय बिराजदार साहेब व पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे साहेब यांना आपल्या मागण्यांचे पत्र निवेदनाद्वारे दिले असून.. या घटनेमध्ये तात्काळ न्याय नाही मिळाल्यास संबंध महाराष्ट्र मध्ये मोठे जन आंदोलन उभे राहील असा इशारा देखील दिला आहे......!
या वेळी वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष व केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी हरिषदादा चक्रणारायण ,
बहुजन समाज पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष विकास चव्हाण,
काँग्रेसचे नेवासा शहर अध्यक्ष रंजन जाधव ,
भिमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभुदास कांबळे,भास्कर लिहीणार मामा, भारतीय बौध्द महासभेचे पंडित साहेब, दळवी साहेब,वंचितचे देवसडे पदाधिकारी योगेश बोर्डे,उत्तम बोर्डे,शिवाजी बोर्डे,भवाळ मामा,यादव साहेब, घोरपडे दादा,यांनी अदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.