बहुजन मुक्ति पार्टी परिवर्तन यात्रा चे शिर्डी मतदार संघात श्रीरामपुर येथे शनिवार दिनांक १०/६/२०२३ रोजी झाले स्वागत

बहुजन मुक्ति पार्टी परिवर्तन यात्रा चे शिर्डी मतदार संघात श्रीरामपुर येथे शनिवार दिनांक १०/६/२०२३ रोजी झाले स्वागत या परिवर्तन यात्रेचे महाराष्ट्रात श्रीकांत दादा ओहोळ प्रदेश अध्यक्ष बहुजन मुक्ति पार्टी व अमोलजी लोंढे साहेब उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली निघालेली यात्रा शनिवारी दिनांक १०/६/२०२३ रोजी सांयकाळी ६ वाजता शासकिय विश्राम गृह संगमनेर रोड श्रीरामपुर येथे येताच गणपतराव मोरे बहुजन मुक्ति पार्टी जिल्हा अध्यक्ष उत्तर विभाग शिर्डी मतदार संघ व मुस्ताक भाई तांवोळी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा अहमदनगर जिल्हा अध्यक्ष यांनी जेष्ठ बामसेफ मार्गदर्शक रामदास धनवटे सर यांच्या सह नेवासा श्रीरामपुर राहाता राहुरी संगमनेर कोपरगांव अकोला या तालुक्यातील पदाधिकारी मतदार संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले व सभा घेण्यात आली या सभेचे अध्यक्ष श्रीकांत दादा ओहोळ साहेब हे होते तर प्रमुख वक्ते अमोल जी लोंढे होते सुत्रसंचालन धनवटे सर यांनी केले गणपतराव मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले श्रीकांत दादा ओहोळ साहेब यांनी मार्गदर्शन पर भाषण केले या वेळी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.