दूरदर्शनच्या पहिल्या इंग्रजी वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांचे बुधवारी 7 जून रोजी वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले आहे.जवळपास ३० वर्षांहून अधिक काळ त्यांनी दूरदर्शनवर अँकरिंग केले. दूरदर्शन मध्ये वृत्तनिवेदक म्हणून १९७१ मध्ये त्यांनी जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या तीन दशकांच्या कारकिर्दीत त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट अँकरचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या निधनाने पत्रकारिता विश्वात शोकळला पसरली आहे.
गीतांजली अय्यर यांनी कोलकाताच्या लोरेटो महविदयालयात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये डिप्लोमा केला. दूरदर्शनमध्ये न्यूज अँकर म्हणून यशस्वी कारकीर्द केल्यानंतर गीतांजली यांनी कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि मार्केटिंगच्या जगातात प्रवेश केला. त्या वर्ल्ड वाईड फंड, CII या उद्योग संघटनेच्या सल्लागारही होत्या. त्या पत्रकारिता जगतातल्या स्टार अँकर होत्या. अय्यर यांनी श्रीधर क्षीरसागर यांच्या ‘खानदान’ या मालिकेत काम केले होते.
1989 साली त्यांना इंदिरा गाधी प्रियदर्शनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मालिकेसह त्यांनी जाहिरातीसाठी देखील काम केले आहे. गीतांजली यांनी त्या काळातील अनेक ब्रँडसाठी काम केले होते. मात्र त्यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्रात पोकळी निर्माण झली आहे.
अनुराग ठाकूर यांच्याकडून शोक व्यक्त
गीतांजली अय्यर यांच्या निधनाच्या बातमीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी शोक व्यक्त केला आहे. अनुराग ठाकूर यांनी ट्वीट करत लिहिले की, ‘दूरदर्शन आणि इंडिया रेडियोच्य पहिल्या लोकप्रिय इंग्रजी वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांच्या निधनाची कळताच धक्काच बसला. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि कुटुंबियाला हे अपरिमित दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.’