अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या 'जिल्हा कार्याध्यक्षपदी' संतोष गायकवाड यांची निवड...*
नेवासा फाटा
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या सूचनेनुसार मतदार संपर्क कार्यक्रमांतर्गत नेवासा फाटा येथे राजेंद्र वाघमारे यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या कार्यक्रमांमध्ये लोकनेते राज्याचे माजी महसूल मंत्री काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गट नेते यांचे संगमनेर तालुक्यातील अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय व उद्योजक,जिल्हा परिषद सदस्य आर. एम.कातोरे यांचे विश्वासू समजले जाणारे संतोष गायकवाड यांची अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या कार्याध्यक्षपदी सर्वानुमती निवड करण्यात आली.
यावेळी गायकवाड यांना त्यांच्या निवडीचे पत्र जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे जिल्हा काँग्रेस अनुसूचित विभागाचे अध्यक्ष राजेंद्र वाघमारे, प्रदेश काँग्रेसचे महासचिव बंटी भाऊ यादव,जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांनी पत्र दिले.
संगमनेर व अकोले तालुक्यात थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्ष गायकवाड हे काम करत आलेले आहे निळवंडे धरण चळवळीमध्ये थोरात साहेबांसोबत सातत्याने काम केलेले संतोष गायकवाड यांची ओळख आहे.
यावेळी कार्यक्रमासाठी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे,प्रदेश काँग्रेसचे महासचिव बंटी भाऊ यादव,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, नेवासा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे,अल्पसंख्यांक काँग्रेसचे दीपकराव कदम, ओबीसी काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक मंगल ताई भुजबळ , तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष शोभाताई पातारे,जिल्हा काँग्रेसचे कमलेशजी गायकवाड, नेवासा शहर काँग्रेसचे अध्यक्ष रंजन दादा जाधव, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुदामराव कदम, सांस्कृतिक विभागाचे चंद्रशेखर कडू,सोशल मीडियाचे सचिन भाऊ बोर्डे, नेवासा मार्केट कमिटीचे संचालक अण्णासाहेब पठारे, परिवहन विभागाचे जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मोटे, युवक काँग्रेसचे किशोर भणगे, राहुरी विद्यापीठाचे माजी कुलगुरू अशोकराव ढगे, एडवोकेट कल्याणराव पिसाळ, अल्पसंख्यांक काँग्रेसचे सुरेंद्र मंडलिक, माजी सरपंच निर्मलाताई ढगे, युवक काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी वैभव वाघमारे, अनुसूचित नेवासा काँग्रेसचे अध्यक्ष किरण साठे, संकेत वाघमारे, इस्माईल शेख, भवाळ साहेब, ज्योती भोसले, राणी भोसले,
आदी मोठ्या संख्येने नेवासा तालुका काँग्रेसचे पदाधिकारी व काँग्रेस जण उपस्थित होते