नेवासा
तालुक्यातील वरखेड ग्रामपंचायत कार्यालयाच्या लेटरहेड वरती काल्पनिक देवी देवतांचा फोटो सरकारी कामकाजासाठी वापरण्यात आली होती त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने तालुका अध्यक्ष विजय भाऊ शिरसाठ व जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ वाघमारे तसेच पत्रकार राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे सरचिटणीस आबासाहेब शिरसाठ संघटनेच्या वतीने नेवासा पंचायत समिती तक्रारी निवेदन 13 फेब्रुवारी 2023 रोजी दिले होते वेळोवेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने सदरील प्रकरण नेवासा पंचायत समितीचे निर्देशनात आणून दिली परंतु अद्याप पर्यंत वरखेड ग्रामपंचायत चे ग्रामसेवक अण्णासाहेब डेंगळे यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे व पंचायत समिती येथे जाब विचारण्यासाठी गेले असता पंचायत समितीचे कर्मचारी विस्तार अधिकारी एन डी पाखरे व इतर कर्मचारी उडवा उडवी चे उत्तर देऊन सरकारी कामकाजामध्ये धार्मिक देवी देवतांचे फोटो वापरू नये ,शासन जीआर असताना सुद्धा उत्तर देत नाही व कोणत्याही प्रकारचा बोध होत नाही असे आज सांगून पंचायत समितीचे कक्ष अधिकारी यांच्याकडे सदरील प्रकरण द्या असे सांगतात ,तर कक्ष अधिकारी असे सांगता की सदरील प्रकरण हे विस्तार अधिकारी यांचे आहे या प्रकरणावरती लवकरात लवकर निर्णय करावा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे