शिवस्वराज्य बहुद्देशीय संस्थेच्या वतीने पुनतगाव येथे रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळेस सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे जीवन देणारे आरक्षणाचे प्रणेते छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करताना पुनतगाव येथे ग्रामपंचायतचे सरपंच माननीय श्री सुदर्शन पाटील वाकचौरे माजी सरपंच माननीय श्री साहेबराव पवार प्रगतशीर शेतकरी यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस फुल पुष्पहार घालून व पूजन करून अभिवादन केले यावेळी माननीय श्री बाळासाहेब वाघमारे अनंत विकास सहकारी सोसायटीचे व्हायचेरमन माननीय श्री अशोक वाघमारे ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री रामा घोगरे पाटील पाचेगाव कानिफनाथ देवस्थानचे सेवेकरी माननीय श्री चोपदार अण्णासाहेब नांदे पाटील महेश वाघमारे उदय वाघमारे हे मान्यवर उपस्थित होते शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले माननीय श्री समाजभूषण संजय रामभाऊ वाघमारे यांनी मान्यवरांचे स्वागत केले संस्थेचे सचिव सौ ताईसाहेब उर्फ रमाबाई वाघमारे यांनी आभार मानले सर्व समाज बांधवांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या