नेवासा
तालुक्यातील गोपाळपूर येथील भ्रष्ट कारभार विरोधात माननीय प्रदीप भाऊ ढोकणे व शिंदे शिवसेनेच्या वतीने महिला आघाडी नेवासा तालुका अध्यक्ष श्री मीराताई गुंजाळ व गोपाळपूर येथील शिवसेनाप्रमुख अपेक्षा घुले, यांच्या नेतृत्वात नेवासा पंचायत समिती कार्यालयामध्ये आंदोलन करण्यात आले घरकुल रस्ते पाणी स्मशानभूमी या विषयावर गटविकास अधिकारी यांच्याशी ग्रामपंचायत भ्रष्ट कारभाराविरुद्ध जन आक्रोश करण्यात आला यावेळेस सुनिता घुले,ज्योतीताई घुले, अंजली घुले,मीनाताई घुले, सविताताई खोमणे,मनीशा घुले, मंगल शेरे द्वारकाबाई आगळे, रेणुका ताई घुले,इत्यादी महिला सहभागी झाल्या होत्या.
तसेच आंदोलनामध्ये ग्रामपंचायत सदस्य श्री संजय राऊत सामाजिक कार्यकर्ते अमित घुले,कुंडलिक घुले, ज्ञानदेव घुले, नेते श्रीधर शेरे ,राजेंद्र ढोकने,हरिभाऊ घुले उपस्थित होते. गट विकास अधिकारी यांना, महिलांनी सर्व मागण्यांचे निवेदन त्यावेळी दिले. गट विकास अधिकारी यांनी गोपाळपूर ग्रामस्थांना अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस रोजी गोपाळपूर येथे येऊन सर्व चौकशी केली जाईल असे लेखी पत्र गोपाळपूर ग्रामस्थांना त्याप्रसंगी दिले.पंचायत समिती येथील माननीय विस्तार अधिकारी साहेब,यांनी दिलेल्या पत्रानुसार,योग्य चौकशी न केल्यास, गोपाळपूर ग्रामस्थांनी व महिलांनी पंचायत समिती नेवासा येथे गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये कुठलीही सूचना न देता उपोषणास बसणार आहेत. असा इशारा देण्यात आला आहे