मिरा फाऊंडेशन व महीला आघाडी शिवसेनेच्यावतीने योगादिनानिमित्त बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार
नेवासा दि.२१ (प्रतिनिधी) - जागतिक योगा दिनाचे औचित्य साधून भेंडा बुद्रूक येथील मिरा फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा तथा शिवसेनेच्या महीला आघाडी तालुका प्रमुख मिरा गुंजाळ यांनी नेवासा येथील महाराष्ट्र बँक शाखेच्या शाखाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा योगदिनानिमित्त सत्कार केला.
यावेळी बोलतांना गुंजाळ म्हणाल्या की, जनतेच्या अर्थिक देवाण - घेवाणीसाठी सकाळी १० वाजेपासून पाच वाजेपर्यंत बँकेतील अधिकाऱ्यांसह कर्मचारी ताटकळत बसून असतात आज योग दिन असल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी निरोगी जीवनासाठी व शारीरिक सक्षमतेसाठी जीवनात योगाला अंगीकारा असे आवाहन
करुन बँक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा आपण सत्कार केलेला असून सदृढ जीवनासाठी त्यांना सुभेच्छा दिल्या असल्याचे गुंजाळ यांनी यावेळी बोलतांना सांगितले या कार्यक्रमाप्रसंगी बँकचे मुख्य प्रबंधक माननीय श्री सागर सोमासे श्री महेश गव्हाणे श्री कुणाल सर आणि इतर अधिकारी मिरा फाउंडेशनचे अध्यक्ष सौ मिरा गुंजाळ सचिव श्री संजय अकोलकर खजिनदार श्री शिवाजी अकोलकर श्री बबनराव अकोलकर श्री संतोष चव्हाण श्री राजेन्द्र जायगुडे श्री भाऊसाहेब पडुले सह आदी मान्यवर उपस्थित होते