चिंचबन , : शालेय अभ्यासक्रमाबरोबरच दैनंदिन जीवनातील व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे या उद्देशाने चिंचबन ता. नेवासा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवडे बाजार व खाऊगल्लीचे आयोजन
केले होते. त्याला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे शाळेचे मुख्यध्यापक श्री. शांताराम सुरडे यांनी सांगितली .
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचबन येथे शनिवारी (ता. 17जून 2013)रोजी शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाअंतर्गत आठवडे बाजार व खाऊगल्लीचे आयोजन केले होते. भाजी घ्या भाजी...ताजी ताजी भाजी' अशा चिमुकल्यांच्या आरोळ्यांनी बाजारात रंगत आली होती. ग्राहकांनी देखील खरेदीसाठी चांगला प्रतिसाद दिला. ग्रामस्थ, महिलांनी आवर्जून या आठवडे बाजाराला भेट देऊन खरेदी केली. यादरम्यान विद्यार्थ्यांनी जवळपास दहा हजार रुपयांची कमाई केली. गावचे सरपंच सो. मिनाक्षीताई गोरक्षनाथ काकडे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी, सर्व शिक्षक कर्मचारी, गावचे सर्व नागरिक,महिला, युवक उपस्थित होते.