पत्रकार संघ; मोहन गायकवाड यांची निवड
नेवासा. नेवासा तालुक्यातील अनुभवी तसेच जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडणारे नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड यांची केंद्रीय पत्रकार संघ (सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन) उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे शिर्डी येथील कार्यक्रमाप्रसंगीकेंद्रीय मंत्री रामदास आठवले व केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कासालकर यांचे हस्ते निवडीचे पत्र गायकवाड यांना देण्यात आले.शिर्डी येथील पत्रकार समेलनप्रसंगी निवडीचे पत्र देण्यात आले असून. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर राहून विविध समस्या शासन दरबारी मांडणार असल्याचे श्री. गायकवाड यावेळी म्हणाले.