गुगळे यांच्या बालाजी देडगाव येथील शेतातून आंबे चोरणाऱ्या वर गुन्हा दाखल

नेवासा 
नेवासा तालुक्यातील देडगाव शिवारातील आंब्याच्या बागेतून दोघे इसम केशर आंबे चोरून घेऊन जात असताना आढळून आले. याबाबत दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत दिनेश हस्तीमल गुगळे (वय ६३) रा. चितळे रोड,अहमदनगर यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की,आमची नेवासा तालुक्यातील देडगाव शिवारात शेती असून तिथे आंब्याची बाग आहे.८ दिवसांपासून आंबे चोरीला जात असल्याची मला माहिती वमिळाली होती. २४ मे रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास
मी आमच्या आंब्याच्या बागेलगतच्या उसामध्ये लपून
बसलो होतो. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मला
दोन इसम त्यांच्या पाठीवरून आंब्याने भरलेल्या गोण्या
घेऊन जाताना दिसले. मी त्यांचे फोटो काढून अचानक
पकडले असता ते मला उडवाउडवीची उत्तरे देऊन
गोण्या तिथेच टाकून पळून गेले. मी देडगाव येथे गावात
गेलो व मोबाईलमधील फोटो ग्रामस्थांना दाखविले असता मला आंबे चोरून नेणाऱ्याइसमांची नावे सुनील दिलीप चव्हाण व गोपाल एकनाथ कुसळकर (दोघेही रा. देडगाव)असे असल्याचे समजले.
या दोघांच्या दोन्ही गोण्यांमध्ये प्रत्येकी ३० किलोकेशर आबे (प्रत्येकी २४०० रुपये किमतीचे) असे एकूण
४८०० रुपये किमतीचे ६०किलो आंबे मिळून आले. या
फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी वरील दोघांवर गुन्हा रजिस्टर नं. ५६१/२०२३ भारतीय दंड विधान कलम ३७९ प्रमाणें गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.